हिंगोली : आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयित रुग्ण हिंगोली शहरात आढळून येण्याची शक्यता असून यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यावर तत्काळ सनियंत्रण करून संसर्गात वाढ होऊ नये, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचे आदेश काढले आहेत.अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांची सदर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.
या कायद्यांतर्गत औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री केल्यास, औषधींची साठेबाजी करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच चुकीचे समज किंवा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचेदेखील आदेश सनियंत्रक यांना दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघू कृती प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी उपाययोजना आखणे, आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे पालन करणे, स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवणे, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेशात नमूद केले आहे.
स्वतंत्र माहिती व मदत कक्षाची स्थापना
कोरोना विषाणूच्या संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-२६१२७३९४ व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक ९१-११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविणे या जबाबदाऱ्यादेखील सनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
हिंगोली : कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर बातम्या प्रसारीत होत आहेत. यास घाबरून जाण्याचे काही कारण नाही. शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे भीती बाळगू नये, आजारी पडण्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शुक्रवारी (ता.१३) केले आहे. खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत.
शासकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन
सर्दी किंवा फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा, खोकल्यावर अथवा शिंकल्यावर एखाद्या आजारी, व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी तयार करताना व केल्यानंतर जेवणापूर्वी, शौचानंतर, प्राण्याचा सांभाळ केल्यानंतर आणि प्राण्याची विष्ठा काढल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवावेत. शिंकताना व खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा, प्रवास करताना काळजी घ्यावी, सार्वजनिक किंवा रस्त्यावर थुंकणे टाळावे, पूर्णपणे शिजविलेलच अन्न खावे, आजारी असलेल्या प्राण्याबरोबर थेट संपर्क आणि प्रवास करणे टाळावे तसेच त्याची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. तसेच जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
येथे क्लिक करा - महाराष्ट्रातून राहूल गांधींचा हा विश्वासू मोहरा राज्यसभेवर
कोरोनाची अफवा; आरोग्य विभागाने केली तपासणी
सेनगाव : तालुक्यातील बन येथे कोरोना विषाणू संशयित रुग्ण आढळल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य विभागाने तातडीने गावात तपासणी मोहीम हाती घेतली. मात्र, एकही रुग्ण या आजाराचा आढळला नाही. सदरील पोस्ट व्हायरल होताच महसूल प्रशासन व आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली होती. महसूल प्रशासनाकडून आरोग्य विभागाला तत्काळ पाहणी करण्याचे सुचविले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बन गावातील स्थलांतरित व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यासोबतच संपूर्ण गावात सर्व्हे केला असता कोरांना विषाणूचा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. दरम्यान, कोरोना विषाणुजन्य आजाराच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. आजपर्यंत तालुक्यात या आजाराचा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीच चिंता करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्य तंदुरुस्त कसे राहील या बाबत काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.