corona 
मराठवाडा

Corona Braking ; परभणीत मृत्युचे अर्धशतक, रविवारी दोघांचा मृत्यू तर ५३ बाधित...

गणेश पांडे

परभणी ः परभणी शहरातील साखला प्लॉट येथील ४५ वर्षीय महिलेचा नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर गंगाखेडच्या ममता कॉलनी भागातील ५५ वर्षीय महिलेचा गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दिवसभरात दोघांचा मृत्यू तर ५३ बाधितांची भर पडल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार ५० तर एकूण मृत्यू संख्येने अर्धशतक गाठले आहे.  

परभणी शहरात बाधितांची संख्या साडेचारशे पार 
परभणी ः शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या साडेचारशेपर्यंत पोचली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला. तेव्हा दिड-दोन महिणे परभणी जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतू, दुसऱ्या लॉकडाउननंतर शहरासह जिल्ह्यात परजिल्हा, परराज्यातील अनेकांनी अधिकृत, अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केला. कोरोना बाधितांची संख्या वाढीस सुरुवात झाली होती. अनलॉकच्या काळात तर टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी झाले. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, महापालिका व पालिका प्रशासनासह पोलिस प्रशासनाची पकड सैल झाली व कोरोनाचा फैलाव झपाट्याने सुरु झाला.   

शहरात साडेचारशेवर बाधित 
शहराच्या बहुतांश भागात आता कोरोनाने हातपाय पसरले आहेत. उच्चभ्रूवस्ती, स्लमएरिया, गावठाण, नव्या वसाहती, गरीब-श्रीमंत, जाती-धर्म असा कुठलाच भेदभाव न करता कोरोना फैलावत चालला आहे. व्यापारी, उद्योजक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनाच कोरोनाने घेरले आहे. ज्या शहरात दररोज एक-दोन रुग्ण आढळून येत होते. तेथे आज दररोज तीस, चाळीस, पन्नासच्या घरात रुग्ण आढळून येत असून समुह संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या टेस्टनंतर रुग्णसंख्येत वाढ 
महापालिकेने शहरात आठ दिवसांपासून रॅपीड ॲन्टीजन टेस्टला सुरुवात केली व रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी, पथविक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली असून व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  त्यामुळे जो व्यापारी वर्ग व्यापार सुरु करण्यासाठी प्रशासनावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबाव आणत होता. तोच व्यापारी वर्गाने आता स्वतःच आपला व्यापार दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तरीही नियमांचा भंग कायम 
कोरोना फैलाव झपाट्याने होत असतांना देखील रस्त्यावरील, बाजारपेठेतील गर्दी कायम आहे. मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन नागरिक करतांना दिसून येत नाही. त्याचबरोबर संचारबंदी, प्रतिबंधीत क्षेत्र आदी घोषित तर केल्या जातात, परंतू त्याची कठोर अंमलबजावणी संबंधीत यंत्रणेकडून होत नसल्याने कोरोनाने शहराला विखळ्यात घेतले आहे 

परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - १०५०
आजचे बाधित- ५३
आजचे मृत्यू-  दोन
उपचार घेत घरी परतलेले - ४५४
उपचार सुरु असलेले - ५४६ 
एकूण मृत्यू- ५०

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT