file photo 
मराठवाडा

कोरोना ब्रेकिंग : परभणीत दिवसभरात वाढले तब्बल ३१ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणीत मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठ वाजता आलेल्या अहवालानुसार दिवसभरात नव्याने ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६७ झाली आहे. यामध्ये परभणी शहरात बारा, पूर्णामध्ये दहा, सेलूत दोन, गंगाखेडला चार, पालमला एक, जिंतूरला दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 
 परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  मोठ्या शहरांतून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता. २०) जिल्ह्यात नऊ, रविवारी (ता. २४) रात्री १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यानंतर सोमवारी (ता. २५) परभणीकरांना दिलासा मिळाला. पण, मंगळवारी (ता. २६) आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून ३६ वर स्थिरावलेली रुग्णसंख्या आता ६७ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.


हेही वाचा व पहा :​ Video: भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय


संचारबंदी लागूनही वाढ
परभणी जिल्ह्यात सुरवातीपासून एकही रुग्ण नव्हता. परंतु, हळूहळू परभणी जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात आणखी वाढ होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार (ता. २६) पासून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. ता. २६ ते २८ मे दरम्यान तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. परभणी शहर तसेच लगतच्या पाच किलोमीटर परिसरात व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे व त्यालगतच्या तीन किलोमीटर अंतराच्या परिसरातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा :​ सहा लाख २५ हजारांचा अवैध वाळू साठा जप्त

संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षाच 
जिल्ह्यात मंगळवारी (ता. २६)  सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २१ संशयित दाखल झाले असून संशयितांची संख्या १९७१ पर्यंत पोचली आहे. २६५ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. एकूण २००४ पैकी १६७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

चेकपोस्टवरील तपासणीवर संशयाची सुई
परभणी जिल्ह्याच्या चारही बाजूंना सीमा बंदीसाठी पोलिसांचे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या चेकपोस्ट ओलांडून लोक जिल्ह्यात येतातच कसे, हे न उलगडणारे कोडे आहे. जर लोक आडमार्गांनी जिल्ह्यात घुसले असतील तर त्यावर गावकरी व कोरोना ग्रामसुरक्षा समिती काय काम करत आहे, हा मोठा प्रश्न आहे.

परभणी जिल्ह्याचे कोरोना मीटर

एकूण रुग्ण - ६७
उपचार सुरू असलेले -६५
घरी सोडलेला - एक
मृत्यू - एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT