sambhajirao patil nilangekar sakal
मराठवाडा

Nilanga News : कोरोना बरोबर काँग्रेसचे सरकार हे एक राज्यावर संकटच; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी डागली काँग्रेसवर तोफ

निलंगा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

राम काळगे

निलंगा - राज्यातील महायुती सरकारच्या काळात अनेक लोकउपयोगी निर्णय झाल्याने हे सरकार सर्वसामान्याचे सरकार सर्व घटकाला सोबत घेऊन चालणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण झाली असून, पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद द्यावा असे आव्हान माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी शुक्रवारी ता. ११ रोजी केले. शिवाय जसे देशावर कोरोनाचे संकट आले होते, तसे राज्यावर काँग्रेसचे सरकार म्हणजे एक संकटच होते अशी तोफ त्यांनी काँग्रेसवर डागली.

निलंगा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा सचिव अरविंद पाटील निलंगेकर, विभागीय नियंञक अश्वजित जानराव, यंञ अभियंता दिलीप जाधव विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, विभागीय अभियंता जगदिश कोकाटे, आगारप्रमुख अनिल बिडवे, बाळासाहेब शिंगाडे, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सोपान अकेले, संजय दोरवे, दगडू सोळुंके, विरभद्र स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार निलंगेकर म्हणाले की, निलंगा मतदार संघातील बस स्थानकाचे काम केवळ काँग्रेसच्या सत्ता काळात रखडले होते. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने एक खडकूही दिला नाही. परंतु महायुतीच्या काळात शहरातील चारही बाजूने अंतर्गत रस्ते होणार आहेत. पाणी पुरवठा योजना वैशिष्ट्येपूर्ण योजना जिल्हा नियोजन योजना असा भरघोस निधी मिळाला आहे.

सर्व घटकाला महायुती सरकारच्या काळात निधी मिळाला असून लाडकी बहिण योजना शेतकऱ्यांना मोफत विज बिल मुलींना मोफत उच्च शिक्षण, असे अनेक निर्णयाबरोबर महायुती सरकारने एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न सहा महिणे मिटला नाही. परंतु स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते असल्याने दिड दिवसात प्रश्न मिटवला म्हणून हे सरकार लोक कल्याणकारी सरकार आहे.

त्यामुळे निलंगा, देवणी येथील सुसज्ज बसस्थानक निर्माण झाले आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास असतो राहिलेले किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील आम्ही केलेले विकास कामाचे उदघाटन करून जनतेसमोर ठेवल्यास गैर काय? असा सवाल उपस्थित करून टीका करणाऱ्या विरोधकाना प्रतिउत्तर दिले.

निलंगा शहरातील उपजिल्हा रूग्णालयात व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व नविन विश्रामगृहाचे आणि कर्मचारी निवासस्थानाचे उदघाटन माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन क्षिरसागर, तालुका आरोग्य अधिकारी प्रदिपकुमार जाधव वैद्यकिय अधिकारी दिपक हुग्गे, डॉ. दिनकर पाटील, डॉ. पी. टी. सोळुंके, डॉ. गणेश पाटील आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT