Corona Patient dies in Latur District 
मराठवाडा

लातुरात कोरोनाचा 21 वा बळी, दिवभरात 16 पॉझिटिव्ह

सुशांत सांगवे

लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा शनिवारी (ता. 4) मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 21वर पोचली आहे. सध्या 168 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आजवर 242 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात लातुर शहर आणि जिल्ह्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदपूर तालुक्यातील काही व्यक्तींचे स्वॅब शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत शुक्रवारी (ता. 3) तपासणीसाठी आले होते. त्यातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा अहवाल शनिवारी (ता. 4) पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी ते अत्यवस्थ स्थितीत होते.

त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पण, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. हा अहमदपूरमधील पहिला तर तालुक्यातील दुसरा बळी आहे. याआधी पाटोदा येथील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 236 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. यापैकी 192 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत, 25 जणांचे अहवाल प्रलंबित तर 2 जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती लातूरमधील एलआयसी कॉलनी (10), खंडोबा गल्ली (1), बालाजी नगर (1) आणि उदगीर (4) येथील आहेत.

13 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
दिवसभारत एकूण 13 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत. त्यातील आज 5 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. इतर 8 रुग्ण हे एमआयडीसीमधील कोविड केअर सेंटर येथील आहेत, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

लातूर : कोरोना मीटर
 

  • एकूण बाधित : 431
  • उपचार सुरू असलेले : 168
  • बरे झालेले : 242
  • मृत्यू : 21

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : थंडीत घट..! नाशिकचे किमान तापमान पोहोचले 17.7 अंशांवर

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT