गिरगाव (जि. हिंगोली) : गिरगाव (ता. वसमत) येथील मुंबईहून परत आलेला जावईच कोरोनाबाधित निघाल्यानंतर पोलिस व आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी गाव सील करण्यात आले असून आरोग्य पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव येथे दक्षता घेतली जात आहे. विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून सरपंच मारोतराव कुंभारकर, ग्रामसेवक आर. एम. खंदारे, डॉ. एस. के. मन्हाळे, डॉ. सचिन ठोके, पोलिस पाटील गंगाधर शिवणकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर कोरोनाच्या पार्श्वभमीवर काम करीत आहेत.
हेही वाचा - केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका
मुंबईहून परतलेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना व वसमत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असताना गिरगाव मात्र यापासून सुरक्षीत होते. परंतु, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरात कामानिमित्त गेलेले ग्रामस्थ गावाकडे परत येत आहेत. मुंबई येथून आलेल्या ग्रामस्थांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत.
ग्रामस्थांचे घेतले थ्रोट स्वॅब नमुने
त्यामुळे प्रशासनही हादरून गेले आहे. येथील काही ग्रामस्थ पंधरा दिवसांपूर्वी गावात आले आहेत. यात सालेगाव (ता. कळमनुरी) येथील रहिवासी व गिरगावचा जावई असलेला नातेवाईकही गिरगावात दाखल झाला. गावात परत आलेल्या ग्रामस्थांचे थ्रोट स्वॅब नमुने आरोग्य विभागाने घेतले होते.
नातेवाईकही हादरून गेले
यात या जावयाचेही थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. यात जावई कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जावयाला वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जावईच कोरोनाबाधित निघाल्याने सासरवाडीतील नातेवाईकही हादरून गेले. खबरदारी म्हणून आता सासरवाडीतील सहा ; तर दुसऱ्या चार जणांना आरोग्य विभागाने वसमत येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
येथे क्लिक करा - Covid-19 : वसमतमध्ये चौघे बाधित, हिंगोली जिल्ह्यात नवे पाच रुग्ण
घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी
आणखी कोण कोण संपर्कात आले होते का ? याचा शोध घेतला जात आहे. शुक्रवारी दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार यांनी भेट देऊन गावात पाहणी केली असून एक गल्ली सील केली आहे. तसेच आरोग्य विभाग व व्हीआरआरटी पथक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत.
जावयाला मूळ गावात दिला नाही प्रवेश
गिरगाव येथील कोरोनाबाधित निघालेल्या जावयाचे गाव सालेगाव (ता. कळमनुरी) आहे. मुंबईहून परत आल्यानंतर जावयाने थेट गाव गाठले होते. मात्र, तेथे गावकऱ्यांनी गावात प्रवेश दिला नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे जावयाने सासरवाडी असलेले गिरगाव जवळ केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.