औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत (covid 19 updates) शुक्रवारी (ता.११) आणखी घट झाली. दिवसभरात ५६२ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येत बीड १३०, उस्मानाबाद १२३, औरंगाबाद ११३, लातूर ६३, जालना ४५, नांदेड ४४, परभणी ३३, हिंगोलीत ११ रुग्ण आढळले. मराठवाड्यात गुरुवारी ६८२ बाधित आढळले होते. उपचारादरम्यान आणखी २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये १०, औरंगाबाद ९, परभणी ३, बीड-जालन्यात प्रत्येकी दोन, नांदेड-हिंगोली-उस्मानाबादेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. काल ४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
औरंगाबादेत ११३ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची भर पडली. यात शहरातील १९, ग्रामीण भागातील ९४ रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार ४८६ झाली. बरे झालेल्या १७५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ६७, ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३९ हजार २१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ९४८ जणंवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबादेत नऊ जणांचा मृत्यू झाला. वडनेर (ता. कन्नड) येथील महिला (वय ६३), पिशोर (ता. कन्नड) येथील पुरुष (६४), चिकलठाणा औरंगाबाद येथील महिला (६५), शांतीपुरा नंदनवन कॉलनी येथील महिला (७६), सीतानाईक तांडा (ता. कन्नड) येथील पुरुष (६५), सटाणा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा (६५) घाटी रुग्णालयात तर दोनवाडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुषाचा (७०) जिल्हा रुग्णालयात, भावसिंगपुरा येथील पुरुष (५८), गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील पुरुषाचा (३९) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यंत ३ हजार ३२२ जणांचा बळी घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.