crime attack stones pelted msrtc bus at Jawkheda Pati tried to set it on fire marathwada Sakal
मराठवाडा

Jalna News : जवखेडा पाटीवर अज्ञातांकडून परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक, जाळण्याचा प्रयत्न

बसमधील वाहक,चालक व सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे हसनाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले

दीपक सोळंके

भोकरदन : तालुक्यातील जवखेडा पाटीवर बुधवारी (ता.13) रात्री काही अज्ञातांकडून परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करून बसच्या दोन्ही बाजूचे काच फोडण्यात आले. शिवाय बस जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिस वेळीच पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

हसनाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना ते हसनाबाद ही रात्रीची हसनाबाद मुक्कामी बस 11 प्रवासी घेऊन हसनाबादकडे येत असतांना चार ते पाच अज्ञातांकडून या बसवर जवखेडा पाटीवर अचानक दगडफेक करण्यात आली. चालकाने बस थांबविला असता यातील प्रवाश्यांना खाली उतरवून या बसला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली शिवाय हसनाबाद पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जवळच असलेल्या खासगी टँकरच्या सहाय्याने आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

बसमधील वाहक,चालक व सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे हसनाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले. हा प्रकार करणारे घटनास्थळाहून पसार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT