Beed News sakal
मराठवाडा

Beed News : राजस्थानी मल्टिस्टेटवर परळीत गुन्हा ; चंदुलाल बियाणींसह संचालकांकडून ठेवीदारांची फसवणूक

शहरातील राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अनेकांंच्या ठेवी आहेत. मात्र, मागील पाच ते सहा महिन्यांपासून शाखेला टाळे लागल्याने ठेवीदार चिंतेत होते.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : शहरातील राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अनेकांंच्या ठेवी आहेत. मात्र, मागील पाच ते सहा महिन्यांपासून शाखेला टाळे लागल्याने ठेवीदार चिंतेत होते. प्रतीक्षेनंतर गुरुवारी (ता.२३) मध्यरात्री फसवणूकप्रकरणी संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी, शाखाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचाही समावेश आहे.

चंदुलाल मोहनलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अल्पावधीतच अनेक शाखा स्थापना करून, व्याजाचे आमिष दाखवून या सोसायटीने संपूर्ण मराठवाड्यात जवळपास २५० कोटींपेक्षा जास्त ठेवी जमा केल्या होत्या.

परंतु कामकाजात अनियमितता आल्याने सर्व शाखांना टाळे लागल्याने लाखो ठेवीदार रस्त्यावर आले. शाखेला टाळे लागताच चंदुलाल बियाणीसह संपूर्ण संचालक मंडळ फरार झाले होते. यामुळे संतापून बिभीषण मानाजी तिडके यांनी गुरुवारी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल सहा ते सात तास लागले. शेवटी बिभीषण तिडके यांच्या फिर्यादीवरून ७ कोटी ५३ लाख २९ हजार ९३८ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT