crime news Attack on female Deputy Tehsildar by brother family dispute beed esakal
मराठवाडा

महिला नायब तहसीलदारावर सख्ख्या भावाकडून हल्ला

सकाळ वृत्तसेवा

केज (जि. बीड) : नायब तहसीलदार असलेल्या बहिणीवर सख्ख्या भावाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास येथील तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात घडली. आशा वाघ असे हल्ल्यात जखमी झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. या भावंडांमध्ये काही दिवसांपासून शेती व अन्य कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता.

तहसील कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून आशा वाघ कार्यरत आहेत. आस्थापना विभागात दुपारी बाराच्या सुमारास मधुकर दयाराम वाघ (वय ४५, रा. दोनडिगर, जि. जळगाव) हा त्यांचा सख्खा भाऊ तेथे आला. गोंधळ घालत त्याने बहिणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. अचानक हल्ल्यामुळे घाबरलेल्या आशा वाघ यांनी कशीबशी सुटका करून मदतीसाठी अन्य विभागात धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखून हल्लेखोरास पकडून खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. आशा वाघ यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT