crime news case registered against three carrying various weapons Osmanabad sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : विविध शस्त्र बाळगणाऱ्या तिघा जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल

एक लोखंडी तलवार तसेच एक कोकरी तसेच लोखंडी कोकरी वजा किरपान तसेच दोन कट्यावन्या आदीसह बाबी जप्त

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर : शहरातील डुल्या मारूती मंदिराजवळ विविध शस्त्र बाळगणाऱ्या तिघा जणांविरुद्ध रविवारी (ता.24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, आरोपींचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. जीतसिंग राजपालसिंग टाक (वय 26) राहणार हडपसर वैधवाडी पुणे, लकीसिंग गब्बरसिंग टाक ( वय 20) राहणार येवत इंदिरानगर झोपडपट्टी टेकडीवर तालुका दौंड जिल्हा पुणे, तिसरा अज्ञान असून तो हडपसर भागातील आहे. यासंदर्भात पोलीसांनी सांगितले की, तिघेही वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुन्हेगार आहेत. तिघेही गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरत असताना स्कॉर्पिओ सह डुल्या मारूती मंदिराजवळ आज (ता. 24 ) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास आले होते.

गजगा रंगाची स्कॉर्पिओ एमएच 14 बीएक्स 9764 हि चोरून आणली होती. तसेच एक लोखंडी तलवार तसेच एक कोकरी तसेच लोखंडी कोकरी वजा किरपान तसेच दोन कट्यावन्या आदीसह बाबी जप्त करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सचिन सोमनाथ राऊत यांच्या फिर्यादीनुसार तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्री कांबळे तपास करीत आहेत. घटनास्थळी उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बरकते, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांनी भेट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT