crime branch action on gutka sakal
मराठवाडा

हिंगोली : अवैध गुटखा विरोधात कारवाई, ६ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त

नागेशवाडी फाटा येथे सापळा रचून अवैध गुटख्यासह सहा लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : नांदेड इथून अवैधरित्या विक्री करिता कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा हिंगोलीत येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळल्याने रविवारी ता.पाच रात्री नागेशवाडी फाटा येथे सापळा रचून अवैध गुटख्यासह सहा लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे नांदेड इथून अवैधरित्या विक्रीसाठी कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा हिंगोलीत येणार आहे.

अश्या माहिती वरून पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शन प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार आकाश टापरे, शेख जावेद, सुमित टाले यांनी नागेशवाडी फाटा येथे अतिशय गोपनीय पद्धतीने सापळा लावून रात्री अकरा वाजता नांदेड येथून गुटखा घेऊन येणाऱ्या कार क्रमांक एम एच ०३ ए आर ९७३५ ला पकडून वाहनाची तपासणी केली असता त्यात एकूण ८४ प्ल्यस्टिक थैलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी आरोग्यास हानिकारक सुगंधित पान मसाला, गुटखा त्यात राज निवास, विमल, गोवा व इतर सुंगधित पान मसाला व गुटखा एकूण दोन लाख ५७ हजार रुपयाचा मिळून आला.

पोलिसांनी नमूद गुटखा व सदरची कार किंमत अंदाजे चार लाख असा एकूण सहा लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलिस ठाण्यात नमूद माल घेऊन जाणारा कार चालक सय्यद अन्वर हुसेन रा. तोफखाना हिंगोली व नमूद मुद्देमाल विक्री करणारे नांदेड चे गोल्डन जर्दा दुकानाचे चालक फहीम व अकबर राहणार देगलूर नाका नांदेड यांच्या विरोधात अन्नसुरक्षा व मानके अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Jammu Kashmir Article 370: कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव; भाजप आमदारांनी फाडल्या प्रती

SCROLL FOR NEXT