Crop Loan sakal
मराठवाडा

Crop Loan : 'सिबिल'च्या नावाखाली पिक कर्जासाठी बँकांची नकारघंटा, शेतकरी हतबल.....!

अलीकडील सलग तीन चार वर्षापासून निसर्गाच्या लहरी पणामुळे मुलांमुलीचे शिक्षण, लग्न व विविध आजारांना तोंड देत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले.

हबीबखान पठाण

पाचोड - अलीकडील सलग तीन चार वर्षापासून निसर्गाच्या लहरी पणामुळे मुलांमुलीचे शिक्षण, लग्न व विविध आजारांना तोंड देत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. शेतीने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज थकबाकीत गेले, अन् शेतकरी हतबल होऊन कर्जाचा डोंगर वाढत जाऊन ते थकीत झाले. नेमके या बाबीमुळे शेतकऱ्या ची पत खालावली अन् याचा आधार घेत बॅकांनी 'सिबिल' च्या नावाखाली त्यांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पाचोड (ता. पैठण) सह चौफेर पाहवयास मिळते.

शेतकऱ्यांना बॅकांकडून पिककर्ज व अन्य कर्ज घेताना शेतकरीच एकमेकांना जामीनदार राहतात. संबंधीताने घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत नसल्याने व अन्य कुठल्या किरकोळ प्रकारचे कर्ज थकीत झाल्याने ते संगणक प्रणालीमुळे समजू लागले आहे. त्यामुळे बँका गरज नसतानाही या शेतकऱ्यां चे सिबिल पाहून त्यांना पीक कर्ज नाकारत असल्याने हजारो शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत आहे.

महाविकास आघाडी सरकारने दोन लाखां पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर दिली. तर दुसऱ्या वेळी दीड लाखाची माफी देण्यात येऊन कर्जाचे पुर्नगठन करण्यात आले. मात्र शेतकरी कर्जमाफीतून मुक्त झाला असला तरी त्याचा परिणाम त्याचे 'सिबिल' खराब करण्यावर होऊन त्यांना पिककर्ज घेण्यापासून वंचित राहवे लागत आहे.

यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने साथ दिल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्या होऊन रिमझिम पावसावर पिके जोमदार बहरले. या पिकांसाठी शेतकऱ्यांना खते, औषधी व मशागतीकरीता तातडीने कर्जाऊ रकमेची आवश्यकता आहे. मागील काळात कर्जमाफी झाल्याने पुढील नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकाकडे जावे लागत असून ऑनलाइन प्रणालीद्वारे कर्ज मागणी अर्ज करण्याचे सांगण्यात आले.

बहुतांश शेतकऱ्यांनी खरिप पिक कर्जासाठी सर्व कागदपत्राची पुर्तता करून जानेवारी तर कुणी फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन अर्ज केले. बँकेकडून मोबाईलवर जेव्हा संदेश येईल तेव्हा बँकेत कागदपत्रे घेऊन हजर व्हावे असे सांगण्यात आले.

मात्र बँकाकडून प्राप्त अर्जाची पडताळणी करून त्यांचे सिबिल तपासले असता अनेकांनी पुर्नगठण केल्याचे तर कुणी कधीच कर्ज न घेतल्याने सिबिल स्कोर अत्यत्य असल्याचे तर कुणी इतरांना जामिनदार असल्याने त्यांचे सिबील स्कोर घसरून बँकाकडून कर्ज नाकारण्यात येत आहे.

बँकेच्या 'मॅसेज' येण्याची प्रतिक्षा संपून हंगाम डोक्यावर आल्याने गरजू शेतकऱ्यांचे बँकेत चकरा मारणे सुरू झाले असून ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज, सातबारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, अन्य बँकेच्या नाहरकत (बेबाक) प्रमाणपत्र घेऊन शेतकरी बँकेत जात आहे.

हे सर्व कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत असून शेतकरी त्रस्त असून यामध्ये सर्व पूर्तता झाल्यानंतर बँकेकडून तुमचा सिबील स्कोर खराब असल्याने अर्ज नाकारण्याचे कळविले जात आहे. सिबीलचे कारण पुढे करून त्यांचे कर्जप्रस्ताव या फेटाळण्यात येत आहे.

पाचोड येथे दोन राष्ट्रीयकृत व एक जिल्हा सहकारी बँक आहे. येथे शेतकऱ्यांचे कर्जासाठी दररोज हेलपाटे सुरू आहे. परंतू सिबील स्कोर घसल्याचे पाहून त्यांना कर्ज नाकारण्याचा बँकांनी सपाटा लावला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांत बॅकाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी वरिष्ठ स्तरावर पीक कर्जासाठी सिबिलची अट शिथिल करण्यात येऊन त्यांना वेठीस धरून आत्म हत्येस प्रवृत्त करू नये अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.

आबासाहेब भुमरे (शेतकरी पाचोड), -

'मी पाचोड येथील एका राष्ट्रीयकृत बँकेकडे पीक कर्जासाठी जानेवारीमध्ये अर्ज केला. माझ्याकडे कोणतेही कर्ज थकीत नसून मी एका मित्राचा पिककर्जासाठी जामीनदार असल्याने मला येथील बँकेने 'सिबिल स्कोर' चे कारण देत कर्ज नाकारले आहे."

धनराज भुमरे, (शेतकरी, पाचोड) -

'पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करा, असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही राष्ट्रीयीकृत बँकांकडून सिबिल स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सिबिलसाठी वेठीला धरणाऱ्या बँकावर कारवाई करण्यात यावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT