- रविंद्र गायकवाड
बिडकीन - बिडकीन येथील एका नामांकित कंपनीमध्ये दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहनाला लागणारे विविध पार्टची निर्मिती करण्यात येते. या कंपनीला लागणारा कच्चा माल हा त्यांचे इतर ठिकाणचे व्हेन्डरच्या माध्यमांतुन खरेदी केला जातो व मालाचे खरेदीच्या संदर्भातील पत्रव्यवहार हा संबधीत कंपनी ही व्हेन्डरला ई-मेलच्या माध्यमांतुन करण्यात येतो.
याच अनुषंगाने कंपनीला त्यांचे एका व्हेन्डरकडुन ई-मेल प्राप्त झाला व त्यामध्ये त्यांनी कंपनीला कच्चा मालाचे उर्वरित रक्कम ही बैंक ऑफ बडोदाचे नविन खात्यात जमा करणे बाबत कळविले. कंपनीने व्हेन्डरच्या नावाने पाठविण्यात आलेल्या ई-मेलला प्रतिसाद देत त्यांची उर्वरित रक्कम ही तात्काळ त्यांनी ई-मेल मध्ये नमुद केलेल्या बैंक खात्यात १८,७८,१११/- रुपये हे RTGS/NEFT द्वारे नेट बैंकिगच्या मार्फतीने पाठविण्यात आले होते. व्हेन्डरला रुपये मिळाले कि नाही याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या मुख्य लेखाअधिकारी यांनी संपर्क साधला असता व्हेन्डरच्या बैंक खात्यात रुपये जमा झाले नसल्याचे त्यांनी कळविले.
यावरून कंपनीला प्राप्त मेलची खात्री केली असता सायबर भामट्याने कंपनीला पाठविलेल्या मेल मध्ये व्हेन्डरचा बनावट व मिळता जुळता ई-मेल आयडी तयार करून व्हेन्डरच्या ई-मेल आयडी तील gmail ऐवजी mail असे संबोधन देवुन फसवणूक करणारा मेल पाठविण्यात आला आणि त्याच ईमेल मध्ये व्हेन्डरचा नविन बैंक खाते क्रमांक देण्यात आला त्यामुळे कंपनीने दिलेल्या बैंक खात्यात वरिल रक्कम ही जमा केली होती.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुख्य लेखा अधिकारी यांनी तात्काळ ग्रामीण सायवर पोलीसांशी संपर्क साधुन फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यावरुन पोलीस ठाणे सायवर येथे कलम ४२० भादंवी सह कलम ६६ (ड) आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार सायवर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकाने तात्काळ कंपनीने रक्कम पाठविलेल्या बैंक खात्याचा तपशील घेवुन सदर रक्कम ही सायबर भामट्याद्वारे इतर खात्यात वळविण्यात येवू नये, याकरिता बैंक ऑफ बडोदा यांचे नोडल अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क साधुन सदर रक्कम ही गोठविण्यात यश मिळविले आहे.
पोलीसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई केल्याने सायबर भामटयाला सदरची रक्कम ही काढुन घेता आली नाही व तक्रारदार यांची मोठी रक्कम सुरक्षित करण्यात पोलीसांना यश आले आहे. तक्रारदार यांची रक्कम सुरक्षित असल्याची खात्री सायबर पोलीसांनी दिल्यानंतर त्यांनी सायबर पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.
अशा प्रकारे मागील ३ महिण्यात फसवुणक झालेल्या इतर १७ प्रकरणात ग्रामीण सायबर पोलीसांनी सातत्याने पाठपुरावा करून यशस्वीरित्या ४१,१८,८४७/- रुपये गोठविण्यात यश मिळविले असुन त्यापैकी ३८,९९,९७९/- रुपये हे फसवणूक झालेल्या नागरिकांना परत मिळवुन दिले आहेत. ऑनलाईन फसवणुक झाल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्रि क्रमांक १९३० व cybercrime.gov.in यावर तात्काळ तक्रार नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नमुद कारवाई ही मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सायवर ग्रामीण येथील सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक जगदिश राऊत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मरळ, पोलिस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार कैलास कामठे, संदीप वरपे, नितीन जाधव, गणेश घोरपडे, मुकेश वाघ, सविता जायभाये, रुपाली ढोले, शितल खंडागळे, यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.