dam dam
मराठवाडा

दिलासादायक! दोन वर्षात एकदाही गाठला नाही धरणांनी तळ

धरणाची ही परिस्थिती पाहता यंदा मॉन्सून वेळेवर मराठवाड्यात दाखल झाला तर धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे

सुनिल इंगळे

औरंगाबाद: गेल्या दोन वर्षापासून औरंगाबाद व नांदेड मंडळातील धरणातील साठा कमी झालेला नसून आज मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये ४० टक्के साठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु गेल्या दोन वर्षापासून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील पैठणपासून (जायकवाडी) ते नांदेड, बाभळीपर्यंतची सर्व धरणांत मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जवळपास ४० टक्के साठा शिल्लक आहे.

धरणाची ही परिस्थिती पाहता यंदा मॉन्सून वेळेवर मराठवाड्यात दाखल झाला तर धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे धरणाजवळील परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान मॉन्सून सुरू झाल्यावर धरणाच्या नियंत्रणासाठी मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर व नांदेड मंडळ १ जूनला पूर नियंत्रण कक्षाची स्थापण करण्यात येणार आहे.

विभाग मोठा मात्र मनुष्यबळ २० टक्केच
मराठवाडा विभागाचा विस्तार मोठा आहे. धरणे, बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ केवळ २० टक्के आहे. मॉन्सून सुरू झाल्यावर तीन महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ नेमले जाते. यात लाइनमन, ऑपरेटर, वॉचमन या कामासाठी दरवर्षी बाहेरचे मनुष्यबळ घ्यावे लागते.

२०२० व २०२१ला चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे, डिसेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामात शेतीला लागणारे पाणी तसेच शिल्लक राहिले. दरम्यान मराठवाड्यात उन्हाळी हंगामाचे पाणी देणे चालू आहे. जून अखेरपर्यंत हा साठा ३० टक्केपर्यंत येईल. मॉन्सून उशीरा दाखल झाला तर या साठ्याचा उपयोग करण्यात येतो. परंतु गेल्या दोन वर्षापासून मराठवाड्यातील कोणत्याच धरणांमधील मृत साठ्यातील पाणी वापराची गरज भासलेली नाही.

मोठ्या बंधाऱ्यांची पाहणी झाली आहे. यात सर्व धरणे सुरक्षित आहेत, काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येणाऱ्या आठवड्यात मराठवाड्यातील धरणांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत बैठक बोलवण्यात आली आहे.
- श्री. तवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.

औरंगाबाद -लातूर विभाग मंडळातील धरणाची स्थिती चांगली आहे. धरणाची पावसाळी पूर्वतपासणी पूर्ण झाली आहे. धरणाची अवश्यक ती रोप, वायरिंग, ऑईलींग, ग्रिसिंग, पेंटिंगची नियमित स्वरूपातची कामे सुरू आहेत. मे महिन्याच्या शेवटपर्यंत ती पूर्ण होतील.
-अभिजित मात्रे, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर.

परभणी नांदेड मंडळातील रूटिंगची चालणारी कामे येत्या ३० मेपर्यंत पूर्ण होतील. दरम्यान, मॉन्सूनच्या अनुषंगाने नांदेड मंडळातील अधिकाऱ्यांची तेलंगाणा सरकारने बैठक घेत धरणातील स्थितीचा आढावा घेतला आहे.
- सब्बिनवार एस. के., अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT