covid 19 covid 19
मराठवाडा

चिंताजनक! मराठवाड्यातील रुग्णसंख्येत घट मात्र मृत्यूदर वाढताच

कोरोनाचे आणखी १४५ बळी, मराठवाड्यात दिवसभरात वाढले चार हजार ३८६ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात बुधवारी (ता.१२) दिवसभरात कोरोनाचे (covid 19) चार हजार ३८६ कोरोना रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येमध्ये बीड १२७०, औरंगाबाद ७११, लातूर ६०१, उस्मानाबाद ५६९, परभणी ४५३, नांदेड ३९८, जालना २४३, हिंगोली १४१ रुग्णांचे निदान झाले आहे.

उपचारादरम्यान १४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये ३१, औरंगाबाद २७, परभणी २२, बीड १७, नांदेड १६, जालना-उस्मानाबादेत प्रत्येकी १३, हिंगोलीतील सहा जणांचा समावेश आहे. (death rate in marathwada higher decrease in new cases covid 19)

सिल्लोड येथील महिला (वय २१), लाडसावंगी येथील पुरुष (५५), देऊळगाव येथील महिला (६५) पैठण येथील महिला (५०), सोयगाव येथील महिला (५३), गंगापूर येथील पुरुष (८३), वैजापूर येथील पुरुष (७५), कन्नड येथील पुरुष (७३), वैजापूर येथील महिला (४०), डोनगाव येथील महिला (६५), नंदनवन कॉलनी येथील महिला (३४), पैठण येथील महिला (६०), पैठण येथील महिला (८७), वारखेड येथील पुरुष (३०), सातारा परिसरातील पुरुष (८५) सिल्लोड येथील पुरुष (५०), खेडा येथील महिला (६७), पैठण येथील पुरुष (७०),

खुलताबाद येथील पुरुषाचा (८०) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. उदय कॉलनी भोईवाडा येथील महिलेचा (७५) जिल्हा रुग्णालयात तर शिवशंकर कॉलनी येथील पुरुष (५९), सिडको एन-७ येथील पुरुष (६३), साईनगर सिडको एन-६ येथील पुरुष (७३), पुरणगील, वैजापूर येथील पुरुष (९७), एमआयडीसी वाळूज येथील महिला (५४), चाऊस गल्ली बिडकीन येथील पुरुष (३७), अंधारी- सिल्लोड येथील पुरुषाचा (८५) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

नवे ७११ बाधित, ६८६ रुग्ण बरे
औरंगाबाद जिल्ह्यात ७११ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ४८३ झाली आहे. बरे झालेल्या शहरातील २१० तर ग्रामीण भागातील ४७६ अशा ६८६ जणांचा सुटी देण्यात आली. आजपर्यंत १ लाख २४ हजार ४८१ रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या ७ हजार १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT