NND27KJP01.jpg 
मराठवाडा

कंटेंटमेंट झोनमध्ये ‘ही’ सुविधा घरपोच पोहोचवा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर पिरबुऱ्हाणनगरसह सील केलेल्या इतर भागातील लोकांना स्वस्त धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यांना घरपोच स्वस्त धान्य पोहचविण्याच्या सुचना आमदार बालाजी कल्याणकर यांनी आढावा बैठकीत केली.

महापालिकेत घेतली आढावा बैठक 
कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या संसर्गजन्य आजाराच्या पाश्र्वभूमीवर आमदार बालाजी कल्याणकर यांनी रविवारी (ता. २६) महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस उपअधिक्षक अभिजित फस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत अन्नधान्य वाटप, सुरक्षा, वीज पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा आदी बाबींचा आमदार कल्याणकर यांनी आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या सुचनाही केल्या. 

कटेंटमेंट झोनमध्ये स्वस्त नऊ धान्य दुकान
पिरबुऱ्हाणनगरसह सील कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या इतर भागांमध्ये स्वस्त धान्यांची नऊ दुकाने आहेत. ज्या लोकांना अद्यान रेशनचे धान्य मिळाले नाही. त्यांना वीस सदस्यांच्या टिममार्फत घरपोच धान्य पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी या वीस सदस्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दत्तनगर भागातील लाभार्थ्यांसाठी असलेले स्वस्त धान्य दुकान मुख्य रस्त्याच्या पलिकडे आहे. परंतु तो रस्ता सध्या बंद असल्याने स्वस्त धान्याच्या लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्रास होत आहे. यातुन काही मार्ग काढण्याची सुचना आमदार कल्याणकर यांनी पुरवठा विभागाला केली.

जिल्हाबंदी करुनही शहरात लोकांचा प्रवेश
शहरात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासनाने काय उपाययोजना केली? असा प्रश्न उपस्थित करुन आमदार कल्याणकर यांनी जिल्हाबंदी करुनही शहरात बाहेरुन लोक येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. देगलुर नाका, शिवाजीनगर, निजाम कॉलनी, आसरानगर, पिरबुऱ्हाणनगर या परिसरात रमजान महिण्याच्या निमित्त लोक एकत्र येणार नाहीत यासाठी जनजागृती करण्याच्या सुचना श्री. कल्याणकर यांनी दिल्या.

बंद पथदिवे सुरु करा
काही भागातील विद्युत रोहीत्रावर लोड येत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. असे पॉईंट कोणते आहेत, याची माहिती घ्यावी. तसेच शहरातील बंद असलेले पथदिवे सुरु करावेत, पिरबुऱ्हाणनगरसह अन्य सील केलेल्या नगरांमध्ये पुनश्च फवारणी करुन स्वच्छता राखावी, अशा सुचना त्यांनी केल्या. काही दवाखान्यात ओपीडी बंद असल्याने इतर आजाराच्या रुग्णांना त्रास होत असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी निदर्शनास आणून दिले. 

औषधी, पीपीई किटसाठी निधी देणार
आरोग्य विभागाचा आढावा घेताना त्यांनी काही ठिकाणी पुरेसा औषधीसाठा उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्याने औषधी व पीपीई किटसाठी आमदार निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. तसेच महापालिकेने पावसाळापूर्वीची कामे हाती घ्यावेत, नाल्यांचा उपसा करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस उपअधिक्षक अभिजित फस्के यांच्यासह नायब तहसिलदार सारंग चव्हाण, महावितरण उपअभियंता श्री. बाहेती, उपायुक्त शुभम क्यातमवार, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग, अभियंता सतिष डावळे यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा नियोजनाच्या सुचना 
उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आमदार बालाजी कल्याणकर यांनी आढावा घेतला. काबरानगर येथील जलशुध्दीकरण केंद्रावर लोड येत असल्याने शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी आसना पंप सुरु करावा, अशी सुचना आमदार कल्याणकर यांनी केली. उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील ७५४ हातपंप व २५९ पॉवरपंप आहेत. त्यापैकी किती दूरुस्त करण्यात आले आहेत. याचा आढावा घेण्यात आला. यावर्षी इसापूर धरणातुन सहा दलघमी, विष्णुपुरी धरणातुन १८.७६ दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातुन २० दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT