file photo 
मराठवाडा

कापूस खरेदी प्रक्रियेचा मुंडण करून निषेध; खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी 

प्रा. डॉ. अंकुश वाघमारे

गंगाखेड (जि.परभणी) : शासनाच्‍या कापूस खरेदीच्या निषेधार्थ पडेगाव येथील गोपीचंदगड शिवारात सखाराम बोबडे गावकर या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. २१) मुंडण आंदोलन केले. 
चार मे रोजी लाॅकडाउनच्या काळात शासनाने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू केली. एकदम कासव गतीने सुरू असलेल्या या कापूस खरेदी प्रक्रियेत एका दिवशी एका खरेदी केंद्रावर २५ ते ३० शेतकऱ्यांच्या गाड्या घेतल्या जात आहेत. जवळपास ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात सात ते आठ केंद्रांवर दररोज अडीचशे तीनशे गाड्यांचे मोजमाप होत आहे. पेरणीचा हंगाम येण्यास पंधरा दिवस अवधी असल्याने सध्याच्या गतीने चालू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेत ४५ हजार शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे अशक्यच आहे. 

शेतकऱ्यांची कोंडी 
परभणी लोकसभा मतदारसंघात कापूस खरेदीची केंद्रे वाढवून दररोज चार ते पाच हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यास सात जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कापूस विकणे शक्य होणार आहे. लाॅकडाउनमुळे सर्व शेतकरीवर्गाने घरात बसून राहावे, असे शासन सांगतात आणि  घर हे कापसाने भरलेले आहे, अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी अडकले आहेत. तरी या कष्टाने पिकवलेला कापूस शासन खरेदी करते की नाही या भीतीने घाबरलेला शेतकरी आपला कापूस मातीमोल भावाने खासगी व्यापाऱ्याकडे विकताहेत. कासव गतीने चालत असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मात्र दुसऱ्या वेचणीचा कापूस शासन खरेदी करत नाही, अशी एकूण विचित्र कोंडी शेतकऱ्याची होत आहे. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे  पडेगावकर यांनी गुरुवारी गोपीचंदगड शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात मुंडण आंदोलन केले. यावेळी शेतकरी संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे, आशिष बोबडे उपस्थित होते.            
हेही वाचा : भावावरच केले कुऱ्हाडीचे वार; कारण वाचून हैराण व्हाल...

कापूस खरेदी केंद्र वाढवा 
शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा माय-बाप म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे असे सरकार आणि प्रशासन मात्र, शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देत आहे. शासनाने लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र वाढवून सर्व शेतकऱ्यांचा आणि सर्व प्रतीचा कापूस खरेदी करावा.
- सखाराम बोबडे, पडेगावकर, शेतकरी

 

सोमवारपासून खरेदी केंद्रात वाढ होणार 
गंगाखेड तालुक्यामध्ये सध्या एका जिनिंगच्या माध्यमातून दररोज जवळपास ६० शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरू आहे. तसेच सोमवारपासून तांत्रिक अडचणी दूर करून आणखीन तीन जिनिंग व तीन ग्रेडरच्या माध्यमातून कापसाची खरेदी होणार आहे.
- संदीप तायडे, सहायक निबंधक, गंगाखेड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT