नर्सीचे संत नामदेव महाराज जयंती 
मराठवाडा

संत नामदेव मंदिरासाठी ६६.५४ कोटी, तीर्थक्षेत्राचे भाग्य उजळणार

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील (Hingoli) तिर्थक्षेत्र असलेल्या नर्सी येथील श्री संत नामदेव महाराज (Saint Namdev Maharaj) यांच्या मंदिर परिसराच्या विकास कामासाठी ६६.५४ कोटी रुपयाच्या निधीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या निधीतून रखडलेली विकासाची कामे झाल्यास नर्सी तिर्थक्षेत्राचे (Narsi) भाग्य उजळणार आहे. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा विविध विकास कामासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा यापूर्वी केली होती. मात्र विकास कामासाठी निधी मंजुर होवूनही मिळाला नसल्याने येथील अनेक विकास कामे रखडल्याने विकास आराखड्याचे भिजत घोंगडे अजूनही पडून आहे. नर्सी नामदेव हे राष्ट्रीय संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असल्याने हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील ठिकाणाला पर्यटन स्थळाचा "ब" दर्जा सुध्दा प्राप्त आहे. या ठिकाणी श्री संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असून येथील कयाधू नदीच्या काठावर परिसरातील भाविकांच्या देणगीतून अंदाजे सात कोटी खर्चातून संगमरवरी दगडाने भव्य असे मंदिर उभारले आहे.

संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर पंजाब राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र या ठिकाणी आलेल्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. येथील मंदिर परिसराच्या विकास आराखड्यामध्ये सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, भाविकांसाठी निवासस्थान, सभामंडप, विद्युतीकरण आतील, विद्युतीकरण बाहेरील, पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, सौरऊर्जा प्रकल्प, अग्निशमन यंत्रणा, घाट बांधणे, घाट सुशोभीकरण, ग्रीन बिल्डिंग, सुरक्षा चौकी, मंदिर परिसर पायाभरणी, दर्शनबारी, अंतर्गत रस्ते, डस्टबिन, दिशादर्शक माहिती फलक, वाहनतळ, आदी कोट्यावधी रुपयाची विकास कामे प्रस्तावित आहेत. संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी मार्च २०२० मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात येथील विकास कामांसाठी तसेच येथे भौतिक सुविधा उभ्या राहण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यावेळी पवार यांनी नर्सी येथील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील तीर्थक्षेत्र नर्सी नामदेव येथील मंदिर परिसराच्या विकासासाठी ६६.५४ कोटीच्या खर्चाच्या निधीची घोषणा केली आहे. घोषणा केल्यामुळे नक्कीच नर्सीवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात निधी केव्हा मिळणार आणि विकासाची कामे कधी सुरू होणार का मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरणार याकडे आता नर्सीसह परिसरातील भाविकांचे लक्ष लागले आहे. श्री क्षेत्र नर्सी नामदेव मंदिर संस्थानच्या विविध विकास कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा फेब्रुवारी २०१९ मध्ये एकूण २५ कोटीच्या निधीची घोषणा केली होती. तर पहिल्या टप्प्यात १५ कोटीच्या विकास कामाच्या आराखड्यास मंजुरी दिली होती. मात्र मंजुरी मिळवून ही निधी न मिळाल्याने येथील विकास कामे अद्यापही रखडलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT