उजनी (जि.लातूर) : आमची सत्ता असताना प्रत्येक वर्षी आम्ही शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देत होतो. यांच्याच काळात पिकविमा (Crop Insurance) का मिळत नाही? असा सवाल करत यावरून राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष असून त्यांची सगळी बदमाशी चाललीय असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. उजनी (ता.औसा) (Ausa) येथे सोमवारी (ता.चार) ते मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी येथील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain Hit Latur) झालेल्या नुकसानीची त्यांना माहिती दिली. रानात कष्ट करून अनेक अडचणींना तोंड देत पिकवलेल्या पिकावर (Latur) निसर्गाने घाला घालत हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
झालेल्या नुकसानी साठी आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारकडून अनुदान आणि पीकविमा मिळवुन देऊ, शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. उजनी गावात तेरणा नदीच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. येथील दोन वस्त्यांचे एवढंच नाही तर या पाण्यामुळे दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला होता. या भयानक परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या तेरणा नदीवरील आणि उजनी-मुरुड मार्गावरील लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांना जोडणाऱ्या पूलांची उंची वाढवण्यात यावी. तसेच उजनी मोड वरील महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी उजनी ग्रामपंचायतीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.