काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला. मतमोजणीच्या शेवटच्या फेरी अखेर पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्या मागे पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यामगे मोठी ताकद उभा केली होती. दरम्यान या पराभवानंतर आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे या निवडणूक निकालाबद्दल खुलेपणाने बोलले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या निवजडणुकीत जात महत्वाची ठरल्याची खदखद व्यक्त केली. धनंजय मुंडे म्हणाले की, "आम्हाला कधी जात, पात, धर्म शिवला नाही. परंतु बीडची निवडणूक जात, पात, धर्म बघून झाल्याने पराभव पत्करावा लागला. कोणाला विजयी करायचं म्हणून नाही तर पाडायचं म्हणून ही निवडणूक झाली"जिंकण्यासाठी निवडणूक झाली असती तर पंकजाताई विजयी झाल्या असत्या" अशा शब्दात लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याची कबुली पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
यावेळी खा. बजरंग सोनवणे यांच्या व्हायरल क्लिपबद्दल बोलतांना धनंजय मुंडे यांनी हात जोडत मी लोकसभा निवडणूकीत हेच सांगत होतो... आम्ही जनतेला मायबाप समजतो... जनताच आमची मालक आहे... परंतु इकडे दोनच महिन्यात निवडून आलेला माणूस मालक समजायला लागला असल्याचा टोलाही मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना लगावला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.