dhanjay munde  sakal
मराठवाडा

Dhananjay Munde : मुंडेंना पालकमंत्रिपद, बीडमध्ये जल्लोष

फटाक्यांची अतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले.

सकाळ वृत्तसेवा

बीड - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी घोषणा होताच बीडमध्ये त्यांचे कट्टर समर्थक बळीराम गवते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आनंदोत्सव साजरा केला.

फटाक्यांची अतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी येथे झालेल्या सभेत केली होती

. दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या संपूर्ण यंत्रणेवर कमांड तयार केली होती, मात्र पालकमंत्री पदाच्या घोषणेची औपचारिकता बाकी होती. बुधवारी (ता. चार) पालकमंत्रीपदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची निवड झाली.

यावेळी श्री. मुंडे यांचे समर्थक बळीराम गवते यांनी सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अविनाश नाईकवाडे, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, नंदकुमार कुटे, माउली गायकवाड, योगेश बाहिरवाळ,

संदीप उबाळे, शिराज तांबोळी, आप्पा इंदुरे, भागवत मस्के, सचिन घरत, आकाश झुनगुरे, राहुल गवळी, विशाल कोटुळे, उत्रेश्वर पाचंग्रे, फय्याज पठाण, मुस्ताक शेख, गजानन फाटे, सनी सातपुते, गणेश ढगे, नविद भाई, राजाभाऊ लोंढे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT