dhananjay munde fan 
मराठवाडा

कार्यकर्ता हवा तर असा... धनंजय मुंडेंची आरोपातून लवकर दोषमुक्तता होण्यासाठी नगरसेवकाचा 'वैद्यनाथाला दंडवत'

सकाळ ऑनलाईन टीम

परळी वैजनाथ: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून मुक्त व्हावेत यासाठी नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभू वैद्यनाथ चरणी श्री सावतामाळी मंदिर ते प्रभू वैद्यनाथ मंदिर दडवंत घातला. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तथ्यहिन व चारित्र्यहनन करणारे आरोप करण्यात आले. मुंडे हे वैद्यनाथाचे निस्सीम भक्त असल्याने प्रभू वैद्यनाथाने हे बालंट दूर करावे यासाठी दंडवत घालण्याचा नवस नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केला होता.

मंत्री मुंडे यांच्यावरील आरोप काही दिवसातच दूर होत गेले असून आरोप करणाऱ्या महिलेचा खरा चेहरा समाजासमोर आल्याने गोपाळ आंधळे यांनी सोमवारी (ता.१८) दुपारी १२.३० वाजता सावतामाळी मंदिर येथून आपल्या पत्नी शुभांगी आंधळे यांच्यासह दंडवत घालण्यास सुरुवात केली.

गटनेते वाल्मीक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संत सावतामाळी मंदिर येथून सुरु झालेला हा दंडवत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, संत जगमित्रनागा महाराज मंदिर येथुन प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे प्रार्थना करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे चंदुलाल बियाणी, दीपक देशमुख, आयुबभाई पठाण, पिंटु मुंडे, शिवसेनेचे अभयकुमार ठक्कर, नगरसेवक विजय भोयटे, चेतन सौंद॓ळे, रमेश भोयटे,सुरेश नानवटे, हनुमान आगरकर, बळीराम नागरगोजे आदींची उपस्थिती होती.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT