Dhangar Society Agitation sakal
मराठवाडा

Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर; लातूरमध्ये तीन तास रास्ता रोको

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात दोन तरुणांनी उपोषण सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर - धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात दोन तरुणांनी उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा व आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. ४) या चौकात सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मागण्यांचे निवेदन प्रशासनाने स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, तरुणांचे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या आंदोलनामुळे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

उपोषणाचा सातवा दिवस

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सातवा दिवस होता. उपोषणाला पाठिंबा तसेच आरक्षणाची मागणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारी कुटुंबीयाचे धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनीच यावे, असा आग्रह

रास्ता रोको आंदोलन तीन तास चालले. आंदोलनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांनीच यावे असा आग्रह आंदोलनकर्त्यांचा होता. यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाशीही संपर्क साधला. काँग्रेसचे माजी महापौर अॅड. दीपक सूळ हे देखील प्रशासनाशी सतत बोलत होते. यातून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. सर्वांशी चर्चा केली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनास प्रस्ताव पाठवल्याची, तो आदिवासी विभागाकडे गेल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकराला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

खासदार डॉ. काळगेंची ग्वाही

खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी उपोषणकर्ते व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. आपण समाजासोबत आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्य शासनाला ठोस निर्णय घ्यावा लागेल, यासंदर्भात लोकसभेतही प्रश्न उपस्थित करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

घोषणांनी परिसर दणाणला

सकाळी अकराला आंदोलनाला सुरवात झाली. अहिल्यादेवी होळकर चौकात चारही बाजूने हलगी वाजवत कार्यकर्ते रस्त्यावर बसले. ‘अहिल्यादेवी होळकरांचे विजय असो’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘एकच मिशन धनगर आरक्षण’, ‘रद्द करा रद्द करा धनगड प्रमाणपत्र रद्द करा’ आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. काही कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यात आतापर्यंतच्या सर्वच शासनांबद्दल रोष व्यक्त करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांकडे वेळ आहे पण धनगर समाजाच्या मागण्यांसाठी दोन तरुणांनी सुरू केलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकही लोकप्रतिनिधी न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT