Dharashiv Constituency Lok Sabha Election Result  Esakal
मराठवाडा

Dharashiv Constituency Lok Sabha Election Result : धाराशिवमध्ये 'मशाल' पेटली; पुन्हा ओमराजे निंबाळकरांचा दणका, अजितदादांचा आयात उमेदवारांचा प्लॅन फसला?

Osmanabad Lok Sabha Election Result 2024 Shivsena UBT Omprakash Rajenimbalkar: धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मोठ्या फरकाने लीड घेतलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. धाराशिव मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मोठ्या मतांनी जिंकले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांची ३ लाख २९ हजार ८८६ मते कमी पडली आहेत.

मिळालेली मते

ओमराजे निंबाळकर - ७,४८,७५२

अर्चना पाटील - ४,१८.९०६

विजयी उमेदवाराचे मताधिक्य - ३,२९,८८६

धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्याचबरोबर या मतदारसंघातून वंचितचे भाऊसाहेब आंधळकर देखील उभे होते.

अर्चना पाटील या तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धाराशिवमध्ये सध्या काँग्रेसची परिस्थिती विकट झाली होती. 1996 ला काँग्रेसचा गड बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने काबीज केला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी धाराशिव लोकसभेवर आळीपाळीने सत्ता मिळवली. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष गेल्या 25 वर्ष लोकसभेत आपली सत्ता आणू शकलेले नाहीत.

धाराशिव मतदारसंघाची रचना?

औसा - अभिमन्यू पवार (भाजप), उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना शिंदे गट), तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील (भाजप), उस्मानाबाद - कैलास पाटील (शिवसेना ठाकरे गट), परांडा - डॉ. तानाजी सावंत (शिवसेना शिंदे गट), बार्शी – राजेंद्र राऊत (अपक्ष)

औसा आणि तुळजापूर मतदारसंघ भाजपकडे आहे, उमरगा आणि परांडा हे शिंदेच्या शिवसेनेकडे आणि उस्मानाबाद विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे. बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुतीकडे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रुपाने मविआचा एकच आमदार इथे आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिले आहेत. त्यात काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील मुरूमकर हे भाजपमध्ये गेल्याने महायुतीचे पारडे जड आहे.

धाराशिव मतदारसंघात सहापर्यंत सरासरी ५५.४६ टक्के मतदान

लोकसभेच्या धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात मंगळवारी (ता. सात) धाराशिव जिल्ह्यात मतदान शांततेत झाले आहे. दुपारी उन्हाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारी शुकशुकाट तर सायंकाळच्या वेळी चांगलीच गर्दी असे चित्र दिसून आले आहे. सायंकाळी सहापर्यंत ५५.४६ टक्के मतदान झाले आहे. तसेच बार्शी (जि. सोलापूर) आणि औसा (जि.लातूर) येथे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरुच होते.

लोकसभेच्या धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघातील दोन हजार १३९ केंद्रांवर मतदान पार पडले. किरकोळ अपवाद वगळता सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊपर्यंत ५.४९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अकरापर्यंत मतदानाला मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी अकरापर्यंत १७.०६ टक्के मतदान झाले. यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघात १७. २४ टक्के,बार्शी विधानसभा मतदारसंघात १६.३१ टक्के, उमरगा विधानसभा मतदारसंघात १७.५२ टक्के, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात १७.४६ टक्के, परंडा विधानसभा मतदारसंघात १७.४२ टक्के तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात १६.४९ टक्के मतदान झाले होते.

२०१९चे चित्र

ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना) विजयी मते : ५,९६, ६४०

राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,६९,०७४

अर्जुन दादा सलगर (वंचित बहुजन आघाडी) मते : ९८,५७९

नोटा मते : १०,०२४

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: १,२७,५६६

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

धाराशिव मतदारसंघातील प्रश्न

मतदारसंघाचा औद्योगिक विकास रखडलेला

केंद्र किंवा राज्य सरकारचा एकही मोठा उद्योग नाही

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संधी, पण दुर्लक्षित मतदारसंघ

भूम-परांडा भागात दुधाचे क्लस्टर, पण पाठबळ नाही

विकास, रोजगार, शिक्षण आणि उद्योगापासून वंचितच

सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव

राजकारण आणि उद्योगावर काही मोजक्या घराण्यांचं नियंत्रण यामुळे धाराशिव मागास म्हणून ओळखला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT