Dharashiv Lok Sabha candidate for mahayuti is not decided debate among voters politics Sakal
मराठवाडा

धाराशिव लोकसभेचा महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने मतदारांत चर्चेला उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे ला धाराशिव लोकसभेसाठी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु होण्यासाठी पंधरा दिवस वेळ राहिला असुन धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने मतदारांत विविध राजकीय चर्चेचे फड रंगले आहेत.

दीपक बारकुल

येरमाळा : आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे ला धाराशिव लोकसभेसाठी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु होण्यासाठी पंधरा दिवस वेळ राहिला असुन धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने मतदारांत विविध राजकीय चर्चेचे फड रंगले आहेत.

विरोधी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून ते प्रचाराला लागले आहेत.उमेदवारीतून पारंपरिक दोन्ही विरोधकांत सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपप्रत्यारोपाचे रान पेटले असेल तरी निवडणुकीची खरी रंगत मतदारांना कधी पाहायला मिळेल,उमेदवारी निश्चित होत नसल्याने एरवी प्रमुख पक्ष म्हणून मिरवणाऱ्या जिल्ह्यातीलराजकीय पक्षाचे भवितव्य काय असेल अशा चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो.गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत २००९ ची निवडणूक वगळता या लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतून शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दीड लाख मताने निवडून आले होते.मात्र गेल्या वर्ष भरापूर्वी राज्यात युतीचे सरकार गेल्या कांहीं महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला सोबत घेऊन महायुतीचे राज्य झाले असताना लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने मतदारांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तुलनेत पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शरद पवार गट प्रबळ आहे.तर महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेच्या तुलनेत एकनाथ शिंदे गटाकडे दोन आमदार,पदाधिकारी कार्यकर्ते,एक महायुतीचे आमदार भाजपाचे तुळजापुरचे आमदार राणाजगजिसिंह पाटील आहेत.

यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी कडून तर गेल्या दोन दिवसांपासून मुलगा मल्हार पाटील यांचे आज पर्यंत मिळून आठ उमेदवारांची उमेदवारी साठी चर्चेत आल्याने मतदारांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये आमदार राणा पाटील,मुंबई ते सुरत मार्गे गुवाहाटीच्या राजकीय बंडाचे किंग मेकर शिंदे गटाचे प्रमुख नेते आमदार मा.ना.मंत्री तानाजी सावंत यांच्यात सख्ख्य असल्याचे जिल्ह्यांनी पाहिले आहे,मग जिल्हा परिषद निवडणुका असो की जिल्हा बँकेच्या निवडणुका असो.

धाराशिव लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.सहा पैकी पाच वेळा शिवसेनेचे मतदार संघावर वर्चस्व असताना गेल्या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचा उमेदवार विजय झाला होता विजयी जागा शिंदे गटाने ही जागा सोडली कशी,जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट,

राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्ह्यात राजकीय प्राबल्य असताना लोकसभेला उमेदवार मिळत नसेल तर जिल्ह्याच्या आगामी येणाऱ्या राजकारणात स्थानिक निवडणुकात जिल्हा परिषद,पंचायत समिती,विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे काय अस्तित्व राहिलं ते मतदारांना सामोरे जाणार कसे अशा चर्चांना उधाण आले आहे.

तर कांहीं राजकीय तज्ञांच्या मते भारतीय जनता पार्टीने मतदारांशी थेट केलेल्या फोन इन सर्वेत धाराशिवची जागा महाविकास आघाडीकडे जाणार असल्याची खात्री झाल्याने ही जागा मित्र पक्षाला देऊन उमेदवारीसाठी बळीचा बकरा शोधला जात असल्याचे सांगितले जात आहे.

आरोप प्रत्यारोप

पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी राणाजगजिसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कडून ऐकमेंकावर सोशल मीडियातून आरोप प्रत्यारोप केले जात असून राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नीने अर्चनाताई पाटील यांनी स्टेटस ठेऊन ओमराजे निंबाळकर हे शेतकरी आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगार नराधम म्हणत टीका केली

तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी एका मेळाव्यात महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने सकाळी एक नाव संध्याकाळी एक अशी अवस्था झाली असुन बाप एका पक्षात आई एका पक्षात आता पोराला एका उरलेल्या पक्षात जा म्हणावं म्हणजे महायुती पूर्ण होईल अशी खिल्ली उडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT