Dharashiv esakal
मराठवाडा

Police Patil Recruitment : ‘पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू करा’

धाराशिव जिल्ह्यात पोलिस पाटील यांची अनेक गावातील पदे रिक्त आहेत

सकाळ डिजिटल टीम

धाराशिव : जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १९) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात पोलिस पाटील यांची अनेक गावातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका-एका पोलिस पाटलाकडे दोन-तीन गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्या अनुषंगाने संबंधित गावाचे आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातही तत्काळ पोलिस पाटील भरती राबवावी. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा,

पोलिस पाटलांचे नूतनीकरण विनाविलंब करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, सचिन जाधव, चंद्रकांत मगर, परशुराम यादव, अजित मंडलिक, मोहन गुरव, श्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

Gold Price: भारताच्या शेजारील देशात सोने झाले 16,000 रुपयांनी स्वस्त; खरेदीसाठी लोकांची झुंबड, काय आहेत भाव?

Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

SCROLL FOR NEXT