Dharashiv Rain Update agricultural crop damage power outage sakal
मराठवाडा

Dharashiv Rain Update : जेवळी (ता. लोहारा) व परिसरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गावात ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाले असून गावात व शिवारात झाडे उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित

सुधीर कोरे

जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव : जेवळी (ता. लोहारा) व परिसरात रविवारी (ता.१२) दुपारी दिड ते तीन या काळात मेघगर्जना व सोसाट्याच वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात काही काळ गारापीटही झाली, जवळपास दीड तास झालेल्या या मुसळधार पावसाने शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बेन्नीतुरा नदी पात्र भरून वाहत आहे.

गावात ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाले असून गावात व शिवारात झाडे उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाले आहे. जेवळी (ता. लोहारा) व परिसरातील गावांत रविवारी (ता.१२) दुपारी दिड ते तीन या काळात अचानक आकाशात मेघांची गर्दी होत मेघगर्जना व प्रचंड वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी दहा पंधरा मिनिटे गारपीटही झाली.

या मुसळधार पाऊसाबरोबरच मोठ्या प्रमाणात मेघगर्जना व वारा होता. यामुळे काही काळ नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाले, गावात व शिवारात झाडे उनमूळ पडले आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून वीजपुरवठा खंडित झाले आहे.

पडलेल्या विजेच्या खांबाचे प्रमाण पाहता शिवारात वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत होण्यासाठी अनेक दिवस लागतील असा अंदाज आहे. यावेळी दीड तास मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने गावात रस्त्यावरून पाणी वाहिले असून ठिकठिकाणी घरात पाणी शिरले आहे. लोहारा-आष्टामोड या मार्गावर ठिकठिकाणी नाल्या दुधडी भरून वाहिल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाले होती.

शिवारात सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून बांध बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. एका वर्षानंतर परिसरातील नदी नाले वाहिले असून लोहारा उमरगा तालुक्यातून वाहणारी बेन्नीतुरा नदी ही या मुसळधार पावसाने पात्र भरून वाहत आहे. हा पाऊस जेवळीसह परिसरातील भोसगा, फनेपूर, वडगाव, वडगाव वाडी, रुद्रवाडी, विलासपूर पांढरी. हिप्परगा सय्यद आदी गावात कमी जास्त प्रमाणात आहे.

जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची यात्रा पार पडत आहे या पावसामुळे कुस्तीच्या फळात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आज रविवारी (ता.१२) सायंकाळी होणारी कुस्तींची दंगल रद्द करण्यात आले आहे. येथील कुस्त्या प्रसिद्ध असून यामुळे दुरून आलेल्या पैलवान व कुस्तीप्रेमींची निराशा झाली. या पावसाने यात्रा कमिटीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सजावट व मंडपाचे नुकसान झाले आहे. या निमित्त मंदिरापुढे थाटलेल्या विविध दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT