औरंगाबाद - स्वतःच्या हौसेपोटी तर काहीजण एकटेपणा घालविण्यासाठी प्राण्यांचा सहारा घेऊन स्वतःचा सोय करून घेतात. मात्र, त्याच प्राण्यांची काळजी घेताना दुर्लक्ष केले जाते. परिणामी कुत्रा, मांजरांना मधुमेहासारखे आजार आढळतात; परंतु प्राण्यांना संतुलीत आहाराबरोबर व्यायाम देणेही गरजेचे असल्याचे पशुवैद्यकीय विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले.
आधुनिक जगात बदलत्या जीवनशैलीनुसार मानवाच्या आवडी निवडीदेखील बदलल्या आहेत. कुत्रा, मांजर पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर काहींना एकटेपणा दूर करण्यासाठी तर कोणी लहान मुलांच्या हट्टापायी प्राणी पाळतात. कुत्रे, मांजरांच्या वेगवेगळ्या प्रजाती असल्यामुळे त्यांच्या किंमती प्रजातीप्रमाणे ठरतात.
काय करावे?
एका कुत्र्याची किंमत दहा हजारापासून ते तब्बल पाच लाखांपर्यंत आहे. हौसेपोटी वाट्टेल ती किंमतही अनेकजण मोजतात. परंतु, त्याच मोती, मनी-म्याऊची काळजी घेताना मात्र कमी पडतात.
कुत्रे, मांजर हे मोकळ्या जागेत, मोकळ्या हवेत राहणारे प्राणी असताना मानव स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना एकाच जागी डांबून ठेवतो. विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ सतत खायला दिल्यामुळे कुत्रे, मांजरांनाही मधुमेह होत आहे. कुत्र्यांना एकाच जागी बांधुन ठेवल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा वाढतो. त्यासाठी दिवसातून काही वेळ प्राण्यांचा शारीरीक व्यायाम करूण घेणे गरजेचे असल्याचे डॉ. बी. आर. डिघुळे सांगतात.
भूक वाढणे, पाणी जास्त पिणे, यातून मूत्रविसर्जन सतत होणे, त्याचबरोबर वजन कमी होणे, अशक्तपणा येणे अशी कुत्र्यांमधील महुमेहाची लक्षणे अढळतात. तर ऑस्ट्रेलियन टेरियर, बिगल यासारख्या परदेशी जातीच्या कुत्रांमध्ये अनुवांशिक मधुमेह आढळतो.
कुत्र्यांचे त्वचेचे आजार वाढले
गेल्या काही दिवसांपासुन कुत्र्यांमध्ये त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. दिवसातुन पशु वैद्यकीय दवाखाण्यात येणा-या कुत्र्यांचे दररोजचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये डर्मटायटीस, केस गळणे यासारखे आजार आढळतात.
काय करू नये?
आजार टाळण्यासाठी कुत्र्यांची त्वचा नेहमी कोरडी असावी,त्याच बरोबर त्याच्या अंगावर गोचीड, गोमाश्या असल्यास त्वचा रोग वाढु शकतात. त्यासोबत कुत्र्यांना ठेवलेल्या जागेत स्वच्छता असावी. यामुळे त्वचेचे आजार टाळता येऊ शकतात.
ढत्या जीवनशैलीप्रमाणे आवडी निवडी बदलल्या आहेत. शहरात आता कुत्रा पाळण्याचा ट्रेंड आला असून माझ्याकडे कोणत्या जातीचा कुत्रा आहे, त्या कुत्र्याची किंमत किती आहे, यावरदेखील स्टेटस ठरविणारे अनेकजण आहेत. आपल्या कुत्र्यांचे गुण सांगताना प्राण्यांनाही भूषणावह वस्तू समजले जाते. परंतु हे करत असतांना प्राण्यांची काळजी मात्र तितकी घेतली जात नाही.
- डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय चिकीत्सालय, औरंगाबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.