Dev. 
मराठवाडा

इंजिनमधून डिझेल गळती अन् प्रवासी खोळंबले...

राजन मंगरूळकर

परभणी ः मुंबईहुन सिकंद्राबाद जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसच्या इंजिनमधुन डिझेल पाइप फुटल्यामुळे डिझेल गळती सुरू झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.तीन) सकाळी सहा ते सातच्या दरम्यान परतूर ते मानवत रोड रेल्वेस्थानक दरम्यान घडला. ह्यानंतर मानवत रोड स्टेशनला दुसरे इंजिन नांदेड येथून बोलावण्यात आले, हे इंजिन येण्यास उशिर झाला, मग दूसरे इंजिन आल्यावर जुने बदलून देवगिरी एक्सप्रेस नांदेडकडे सोडण्यात आली. दरम्यान, रोज सकाळी ७.१० ला परभणीत येणारी देवगिरी आज तीन तास उशिरा म्हणजेच १०.१० वाजता आली. पर्यायाने तिला नांदेड, सिकंद्राबादला जाण्यास चार ते पाच तास विलंब झाला. डिझेल गळती झाल्याने रेल्वेतील आणि स्थानकावर वाट पाहात बसलेले प्रवासी मात्र खोळंबले. 

दक्षिण मध्य रेल्वे विभागात सध्या वापरले जाणारे पॅसेंजर, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्टचे इंजिन जुने झाले आहेत, याचा प्रत्यय दररोज वेगवेगळ्या घडणाऱ्या घटनांवरून दिसून येतो. काही डिझेल इंजिन डबल पॉवर आहेत तर अनेक जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती, देखभाल करून ते लावणे गरजेचे आहेत. मागील तीन ते चार महिन्यात आदिलाबाद-परळी. पूर्णा-हैदराबाद, नागपूर-मुंबई नंदिग्राम आणि आज देवगिरी असे चार प्रकार आग, डिझेल गळतीचे या विभागात घडले आहेत. 

पुणे- निझामाबाद वेळेवर धावेना 
पुणे-निझामाबाद ही पॅसेंजर मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या रद्द कालावधीनंतर सुरू झाली. ही गाडी पुणे- नांदेड एवढीच चालवली जात आहे. तिला नांदेड - निझमबाद रद्द केले आहे. तीच रेल्वे दुपारी चार वाजता नांदेड - पंढरपूर सोडली जाते. ह्या गाडीचे विशेष असे की ती रोज किमान सहा ते सात तास उशिरा धावते. पुणे येथून गुरुवारी दुपारी दोनला निघालेली गाडी शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान नांदेड ला २४ तासानंतर आली. सकाळी ४.४० ला परभणीत येणारी ही गाडी ११ च्या दरम्यान आली होती. ही गाडी ना प्रवाशांच्या कामाची ना अप-डाउन करणाऱ्यांच्या. 

सकाळी एकामागे एक तीन तर दुपारी एकच गाडी वेळेवर जाइना                               सकाळी देवगिरी, पुणे-निझामाबाद, पुशपुल ह्या गाडी १० ते ११ च्या मध्ये परभणीकडून पूर्णा, नांदेडकडे गेल्या. ह्यानंतर दुपारी १२.३० ला नगरसोल-नांदेड पॅसेंजर वेळेत तर परभणीवरून काढली. पण तिला मिरखेल येथे १२.५० ते १.३० एक मालगाडी पूर्णाकडे गेल्याने तर पूर्णा येथून परभणीकडे नांदेड-औरंगाबाद गाडी सोडली. त्यामुळे ही पॅसेंजर एकाच जागेवर होती. जेव्हा सोडली त्यानंतर पूर्णा येथे पुलावर असताना नरखेड-काचीगुडा इंटरसिटी पूर्णा येथून सोडली. किमान पाच मिनिट इंटरसिटी थांबवली असती तर लिंक गाडी भेटून अनेक जण नांदेड येथे जाऊ शकले असते. दररोज हाच प्रकार मुद्दाम केला जातो. औरंगाबाद येथून बसलेले असो किंवा जालना, परभणी ज्यांना पुढे नांदेडला जायचे त्यांना इंटरसिटी लिंक दिली तर प्रवाशांचा वेळ वाचेल.

दोन जंक्शन तरी नो action
परभणी ते नांदेड दरम्यान परभणी आणि पूर्णा हे दोन मोठे जंक्शन आहेत. किमान ह्या जंक्शनला काही अधिकार असावेत, इथे स्थानकावर कोणत्या गाड्या कुठे घ्यायच्या आणि कधी सोडायच्या ह्याचे सर्व अधिकार नांदेड येथील डीआरएम ऑफिसच्या रेल सदनमध्ये कंट्रोलला दिले आहेत. त्यामुळे ट्रॅक मिळत नाही तोपर्यंत मिरखेल, पिंगळी येथे पॅसेंजर उभ्या करून गाड्या अडवण्याचे काम सुरू आहे. जंक्शन नाव पण action काय हेच कळत नाही.

काचीगुडा पुढे सोडण्याचा अट्टहास 
परभणी वरून दुपारी १२.३० ला सोडलेली नगरसोल-नांदेड गाडी १.४० ला पूर्णा येथे आली. ह्यानंतर काचीगुडा-नरखेड इंटरसिटी पुर्णेत २.१० ला आली. तिचे इंजिन बदलून २.५० ला वसमतकडे निघाली. एक मालगाडी नांदेडकडे गेली तर एक निरीक्षण यान पुर्णेत दोन नंबरवर आले. इंजिन बदलून पुन्हा २.५० वाजता नांदेडकडे गेले तरी प्रवासी पूर्णेत आणि मग काचीगुडा पॅसेंजर तीनला पुर्णेत आल्यावर तिला नांदेडकडे सोडण्यात आले. ती चार वाजता नांदेड पोहचली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT