E sakal dhrmabad.jpg 
मराठवाडा

सभापती, उपसभापती निवडणुकीत येथे झाला राडा

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि.नांदेड)ः पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. सहा) होती. परंतु, सदस्यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हिप बजावण्याच्या कारणावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, पंचायत समितीमध्ये सदस्यांची वाहने जाताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवून जवळपास अर्धा तास वाहन अडवून ठेवल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यामुळे सदरील निवडणूक लांबणीवर पडली. शिवसेनेचे भावी सभापती मारोती कांगेरू यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून टाकले. त्यामुळे निवडणूक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

तीन सदस्यांना ठेवले अज्ञातस्थळी
येथील पंचायत समितीच्या निवडणुकीत चार पक्षांचे चार उमेदवार निवडूण आले होते. त्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे. सुरवातीला सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे अडीज वर्षे भाजपच्या रत्नमाला जयराम कदम यांनी सभापतिपद भोगले व कारभारही पारदर्शक केला आहे. परंतु, पुढील अडीच वर्षे सभापतिपद इतर मागास वर्गीयसाठी आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचे सदस्य मारोती कांगेरू यांची सभापतिपदी निवड होणार होती. परंतु, उपसभापतिपदाची निवडणूक डांबर घोटाळ्यातील गुत्तेदार मोईजोद्दिन करखेलीकर यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते. पंचायत समितीच्या तीन सदस्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. 

झटापट करून मारहाण 
निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी १० ते १२ पर्यंत होती. पावणतास अगोदर सदस्यांची वाहन पंचायत समितीमध्ये जात असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाहेरच रोखून आम्हाला सदस्यांना पक्षाचा व्हिप देण्याचा हट्ट महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरून बसले होते. सदरील वाहन रोखून धरल्यामुळे वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते. पोलिस, भाजप व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटाफटी झाली. शेवटी सदस्यांचे वाहन पंचायत समितीमध्ये गेले. वाहनातून शिवसेनेचे सदस्य तथा भावी सभापती मारोती कागेरू उतरताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कागेरू यांना झटापट करून मारहाण करण्यात आली व अंगावरील कपडे फाडण्यात आले. 


शेवटी मारोती कांगेरू व इतर सदस्यांनी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात पोचले. पंरतु, काही उपयोग झाला नाही. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपून दोन मिनिटे झाली होती. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचे जाहीर केले व जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरील माहिती पाठविण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुढील निवडणूक प्रकिया पार पाडण्यात येणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

जनतेत उलट सुलट चर्चा 
शेवटी झटापट सुरू असताना माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, रमेश गौड, देवन रेड्डी, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, बाजार समितीचे संचालक दत्ताहारी आवरे हे घटनास्थळी दाखल झाले होते. विशेष असे की, घटनास्थळी सुरपासून ते शेवटपर्यंत डांबर घोटाळ्यातील गुत्तेदार मोईजोद्दिन करखेलीकर हे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. उपसभापती सौ. राजश्री मुपडे यांना करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविली आहे. या वेळी पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले व पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT