download 
मराठवाडा

दोन बेपत्ता मुली सापडल्याने यंत्रणेने सोडला सुटकेचा निश्‍वास 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने समाजकल्याण प्रशासन विभागाची धांदल उडाली होती. यामुळे पालकवर्गात एकच खळबळ उडाली होती. तीन दिवसानंतर ह्या दोन्ही मुलींना शोधण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. 
 

नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या वेळेपेक्षा एक तास उशीर झाला तरी, विद्यार्थीनी वसतीगृहात परत येतात. त्यासाठी तशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मंगळवारी (ता.३१) डिसेंबरला गांधीनगर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुली ३१ डिसेंबरला वसतीगृहातुन बाहेर पडल्या, त्या रात्री उशिरापर्यंत परतल्या नव्हत्या. दोन्ही मुली रात्री उशीरा न आल्याने वसतीगृह प्रशासनाची तारंबळ उडाली. वसतीगृह प्रशासन विद्यार्थीनींच्या बाबतीत किती गंभीर आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली व वसतीगृहातील विद्यार्थीनींचा सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बुधवारी (ता.एक) जानेवारीला मुली हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात
पोलिसांनी पथक थापन करुन त्यांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. शुक्रवारी (ता.तीन) मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. शासकीय वसतीगृहातुन पळुन गेलेल्या या दोन्ही विद्यार्थीनी आंध्र प्रदेशातील रेनीगुंटा या गावात सापडल्या. मुलींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेश राज्याकडे रवाना झाले आहे. लवकरच या मुलींना ताब्यात घेऊन दोन्ही मुलींना आई-वडीलांच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. 

पालकांनी मुलींकडे लक्ष देण्याची गरज  
नांदेड हे शैक्षणिक हब म्हणून उदयास आले आहे. दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनी शहरात भाडेतत्वावर किंवा शासकीय वसतीगृहात वास्तव्यास असतात. त्यामुळे अनेक आई-वडीलांना मुलांची चिंता वाटत नाही. मात्र, शिक्षणासाठी शहरात आलेली आपली मुले नेमकी शिक्षणच घेतात की मोकळीकतेचा फायदा घेतात, याबद्दल पालकांचे मुलांवर फारसे लक्ष नसते, त्यामुळे अशा घटना घडू नयेत, म्हणून पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.  


त्या मुलींना वसतीगृहातुन केले बेदखल
वसतीगृहात राहणाऱ्या मुलींसाठी कडक नियम आहेत. महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर किमान एका तासाच्या आत मुलींनी वसतीगृहात हजेरी लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक मुली ह्या नियमांचे पालन करत नाहीत. दुसऱ्याच्या सांगण्यावरुन मुलीकडून नियमाची पायमल्ली होते. या दोन्ही मुलींनी नियम मोडून वसतीगृहातुन बेपत्ता झाल्या होत्या. त्या दोघींना वसतीगृहातुन काढुन टाकण्यात आले आहे. 
- तेसज माळवदकर (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT