वसमत (जि. हिंगोली) : रोहयोच्या कामावर असलेल्या मजुरांसाठी अथवा दुर्गम भागात निर्जंतुकीरण व हॅंडवॉश सुविधा मिळून कोरोनापासून सुरक्षा मिळावी, यासाठी ग्रामसेवक डॉ. रवींद्र तेलगोटे यांनी दुचाकीवर फिरते निर्जंतुकीकरण यंत्र तयार केले आहे. त्याचा मजुरांसह ग्रामस्थांना लाभ होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या लढ्यात पोलिस प्रशासनासह आरोग्य विभाग आपले मोठे योगदान देत आहे. त्याबरोबरच नागरिकही खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन पाळत आहेत. तसेच स्वच्छतेसंदर्भात दक्षता पाळत आहेत.
गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार
हातावर पोट असलेल्या व सध्या रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना निर्जंतुकीकरण व हँडवॉशची सुविधा उपलब्ध व्हावी व कोरोनापासून सुरक्षा मिळावी, यासाठी ग्रामसेवक डॉ. रवींद्र तेलगोटे यांनी दुचाकीवर फिरते निर्जंतुकीकरण युनिट तयार केले आहे.
श्री. तेलगोटे बीएएमएस आयुर्वेदातील पदविधर आहेत. ग्रमसेवक म्हणून काम करताना ते ग्रामस्तरावर गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार करीत असतात.
पत्नीच्या सहकार्याने उभारणी
सामाजिक कामाची आवड असल्याने ते नेहमीच शासनाच्या विविध उपक्रमांत सहभागी असतात. दुर्गम भागात रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या कामगाराचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर येत होता. या सामाजिक प्रश्नातून त्यांना दुचाकीवरील फिरते निर्जंतुकीकरण युनिटची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी पत्नी डॉ. सुनिती तेलगोटे यांच्या सहकार्याने युनिटची उभारणी केली.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्याक्षिक
ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन मजुरांचे निर्जंतुकीरण करणे त्यांना शक्य झाले आहे. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या उपस्थितीत फिरते निर्जंतुकीकरण युनिटचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
असे चालते यंत्र...
हे यंत्र हाताच्या स्पर्शाशिवाय केवळ पायाच्या वापराने लिक्विड सोप आणि यांच्या वापराने हाताची स्वच्छता करता येते. उजव्या पायाने पायालगत असलेली एक विशिष्ट कळ दाबून धरली असता सुरू होते. पाय काढून घेतला असता नळावाटे येणाऱ्या पाण्याचा स्तोत्र थांबतो. दुचाकी मोपेडमध्ये एक वॉटर पंप बसविलेला आहे. यासाठी ४० लिटर द्रावणाची कॅन दुचाकीवर बसविण्यात आली आहे.
येथे क्लिक करा - औंढा नागनाथ संस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती
बॅटरी सोलार चार्ज्ड
२० फूट पाईपची लांबी असल्याने त्रिजेच्या परिघात फवारणी करणे सुलभ होते. अडगळीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पाईप पोचू शकत नाही, अशा ठिकाणी पाठीवरील फवाऱ्याने निर्जंतुक द्रावणाची फवारणी करता येते. तसेच युनिटमध्ये हँडवॉश लिक्विड ऐवजी अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरची बॉटल बसवता येऊ शकते. विशेष म्हणजे युनिटमधील बॅटरी सोलार चार्ज्ड असल्याने विजेची कमतरता भासत नाही.
सामाजिक कार्यातून आनंद मिळतो
ग्रामसेवक असल्याने गावस्तरावरील गोरगरीब, मजूर, नागरिकांच्या अडचणी माहीत आहेत. नोकरीचे कर्तव्य बजावण्या बरोबरच सामाजिक देणे असलेली जाणीव बसू देत नाही. तसेच स्वत: डॉक्टर असल्याने गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचाही आनंद मिळतो.
-डॉ. रवींद्र तेलगोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.