photo 
मराठवाडा

या जिल्ह्यात दिवसाही काळोखच 

कैलास चव्हाण

परभणी: शहरासह जिल्हाभरात गुरुवारी (ता.२६) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वातावरण आंधारुन आल्याने परभणीकरांना सुर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेता आला नाही. दुपारपर्यंत सुर्यदर्शन झाले नसल्याने पावसाळी वातावरण निर्माण होऊन सर्वत्र संमिश्र स्वरुपात काळोख पसरला होता. त्यामुळे वाहनधारकांना दिवे लावून वाहने चालवावी लागली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दररोज दुपारपर्यंत सुर्यदर्शन होत नसून पावसाळी वातावरण तयार होत असल्याने थंडी देखील कमी झाली आहे. गुरुवारी (ता.२६) सुर्यग्रहण होते. मात्र सकाळपासून काळेकुट्ट ढग जमा झाल्याने अंधारुन आले. त्यात काही वेळ हलक्या स्वरुपात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. 

खगोलप्रेमींची निराशा

दुपारपर्यंत सुर्यदर्शन झाले नव्हते. त्यामुळे परभणीत सुर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेता आला नसल्याने खगोलप्रेमींची निराशा झाली. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात सुर्यग्रहण पाहण्याची सोय उपलब्ध केली होती. त्यासाठी मोठ्या संख्येने खगोलप्रेमी विद्यार्थी जमा झाले होते. परंतु, ढगाळ वातावरण कमी झाले नसल्याने सुर्यग्रहण दिसू शकले नाही. परभणी आणि परिसरात काळोखाचे वातावरण राहिल्याने रस्त्यावर वाहनधारक दिवे लावून प्रवास करत असल्याचे चित्र होते.

पावसाच्या सरी कोसळल्या

 मागील अनेक दिवसांपासून असे वातावरण असल्याने दररोज ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. बुधवारी (ता.२५) दिवसभर ढगाळ वातावरण राहुन मध्यरात्री ११ च्या दरम्यान हलक्या स्वरुपात पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. पावसाच्या सरी कोसळल्या. यापूर्वीच मंगळवारी (ता.२४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने मराठवाडयात आकाश स्‍वच्‍छ ते ढगाळ राहुन औरंगाबाद व जालना जिल्‍ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलका; तर इतर जिल्‍ह्यात हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली होती. त्याप्रमाणे ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरुपात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

 पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

मागगील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. हरबरा, ज्वारी या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी हल्ला चढवला आहे. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी तूर फस्त करण्यास सुरुवात केली आहे. परभणीसह जिंतूर, पूर्णा, पालम तालुक्यात हरभऱ्यावर अळींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

परभणीसह जिंतुरमध्ये रिमझीम
गुरुवारी १०.३० वाजता जिंतूर तालुक्यात बोरी शिवारात रिमझीम पावसाने हजेरी लावली. परभणीत सकाळी हलक्या सरी कोसळल्यानंतर दुपारपर्यंत पावसाचा शिडकावा सुरु होता.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT