latur sakal
मराठवाडा

Latur News : परिवर्तनासाठी एकजुटीचा निर्धार ; लातूरला काँग्रेसची विभागीय बैठक, केंद्र सरकारवर टीकास्त्र

केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारबद्दल देशातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घाबरली आहे. विरोधकांना अनेक मार्गांनी कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या स्थितीत एकजूट दाखवून केंद्रात परिवर्तन घडवण्याचा निर्धार येथे सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारबद्दल देशातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घाबरली आहे. विरोधकांना अनेक मार्गांनी कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या स्थितीत एकजूट दाखवून केंद्रात परिवर्तन घडवण्याचा निर्धार येथे सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत करण्यात आला.

पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, पक्षाचे नेते संपतकूमार, खासदार रजनी पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजीमंत्री तथा मराठवाडा विभागीय बैठकीचे समन्वयक अनिल पटेल, नसीम खान, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, उल्हास पवार आदी उपस्थितीत होते.

केंद्रातील मोदी सरकारवर सर्वच घटक नाराज आहेत. या परिस्थितीत निवडणूका जिंकण्यासाठी सत्ताधारी मंडळी जातीजातींत भांडणे लावत आहेत. धार्मिक वातावरण निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या वातावरणात जनतेला सत्य परिस्थिती समजून सांगण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन घाबरलेली सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट कायम राखावी, असे आवाहन चेन्निथला यांनी केले.

माझे गुरू विलासराव देशमुख. त्यांच्या लातूर या जन्मभूमीतून महाराष्ट्र जिंकण्याची प्रेरणा घेऊन जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्याला भारतीय जनता पक्ष कारणीभूत असून या पापाची शिक्षा त्यांना दिल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.

थोरात, नसिम खान, रजनी पाटील यांची भाषणे झाली. आमदार अमित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ओमप्रकाश झुरळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीशैल उटगे यांनी आभार मानले.

आंबेडकरांनी साथ दिल्यास बदल : चव्हाण

महाविकास आघाडीसोबत राहावे म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. त्यांना सोबत घेण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. पण त्यांची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. प्रकाश आंबेडकरांनी साथ दिली तर आगामी निवडणुकीत निश्चित बदल दिसेल. मतांची विभागणी होणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जागा वाटपाच्या धोरणात जागा कोणाला सोयीची आहे, स्थिती कशी आहे याचा विचार करून निर्णय घेतला तर त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT