फोटो 
मराठवाडा

मन्याड खोऱ्यांचा दिव्यांग दत्तात्र्य हरफनकौला कलावंत

हाफीज घडीवाला

कंधार ( जिल्हा नांदेड) :  अनेकजण अपयशाने खचुन जाऊन उगीच नशिबाला दोष देत असतात. हाती घेतलेले काम अर्ध्यावरच सोडून देतात. दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत तर सांगणेच नको. परंतु काहीजण महत्वकांक्षी असतात. ते जिद्द सोडीत नाहीत. हिंमत असले यशाचे शिखर सहज सर करता येते, याचा प्रत्यय कंधार येथील दोन्ही पायाने जन्मजात अपंग अवलिया दत्तात्रय एमेकर यांनी करून दाखवले. दिव्यांगावर मात करून सुरू असलेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ध्यैयाचा ध्यास आणि त्यासाठी परिश्रम केले की यश हमखास मिळते, हे एमेकर नावाच्या मन्याडखोरी हरफनमौला कलावंताने सिध्द करून दाखवले आहे. समाजप्रबोधनासह विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व अन् सुंदर अक्षरांचे मार्गदर्शन महायज्ञ ते अखंडपणे चालवत आहेत.

नानाविध कलेचा अथांग सागर दडलेला 

एका व्यक्तीला एक किंवा दोन कला अवगत असतात. पण या कल्पकतेच्या महासागरात तब्बल पंधरा ते वीस कला वास करतात. गुण घेण्यासाठी आपण अभ्यास करतो पण, पण या कलांवताकडे स्वयं अध्ययनातून सृजनशीलता कशी जोपासता येते अन् व्यक्तिमत्व ठळक करण्यासाठी ‘तुच आहेस तुझ्या व्यक्तिमत्वाचा शिल्पकार’ या दृढ निश्चियी शब्दांतून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन, सूत्रसंचालन, मनातील शब्द लेखनबध्द कसे करायचे, चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व कला, शिल्पकला, साहित्य, काव्य, वात्रटिका अशा नानाविध कलेचा अथांग सागर दडलेला आहे.

दोन्ही पायांनी अपंग

दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यांनी त्याचा कधी बाऊ केला नाही. त्यावर मात कशी करता येईल, याचाच ते सातत्याने प्रयत्न करीत राहिले. त्यात त्यांना यश देखील मिळाले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शहर व पंचक्रोशीत विविध उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटीविला आहे. त्यांनी कंधारच्या शिवाजी नगरात सुंदर अक्षर कार्यशाळा स्थापन करून शालेय विद्यार्थ्यांच्या अक्षरांना वळण लावण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःची कल्पक अक्षर पध्दत विकसीत केली आहे. अक्षर म्हणजे आपले धनच असते. म्हणून ते विविध विद्यालयात जावुन प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये वळणदार अक्षरांची गोडी निर्माण करून प्रेरणा देतात.

बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने ५१ बोधीवृक्षांचे वाटप

२०१४ च्या बुध्दपौर्णिमेच्या निमित्ताने ५१ बोधीवृक्षांचे वाटप करुन पर्यावरणावरील प्रेम व्यक्त केले. शिवाय ‘खंदारी’ वात्रटिकेतूनही समाजातील विविध ज्वलंत विषयावर ते प्रबोधन करतात. शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेची ओढ लागावी या साठी त्यांनी चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी, आकाश कंदील, निबंध, रंगभरण, चारोळी, श्रृतलेखन, इंग्रजी शब्दांन्ताक्षरी अशा नानाविध स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढीस लागवी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. 

श्री शिवाजी हायस्कुलमध्ये ते ग्रंथपाल या पदावर कार्यरत

वाळलेल्या दुधग्यापासून माशा, फ्लाॅवर पाॅट, हस्तकलेतून सुंदर मयुर, कापसापासून पैसे खाणारा बगळा, मातृशिल्प, अक्षर सुगरण, राष्ट्रीय एकात्मता शिल्प अशी अनेक कलानिर्मिती करुन त्यांनी आपला आपला ठसा उमटवला आहे. आपली कला मन्याडखोऱ्यात रुजवण्यासाठी ते सातत्याने कष्ट उपसत आहेत. ते दोन्ही पायांनी अपंग आहेत मात्र ते आपल्या हाताच्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कंधार येथील श्री शिवाजी हायस्कुलमध्ये ते ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर लक्ष वेधून घेणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT