Do not give power to narendra modi says sharad pawar at public meeting in partur jalna 
मराठवाडा

Loksabha 2019 : 'मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे लोकशाहीचा गळा कापल्यासारखे'

योगेश बरीदे

लोकसभा 2019 
परतूर : या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे स्वतःच्या हाताने लोकशाहीचा गळा कापल्या सारखे आहे, असे उद्गार परभणी लोकसभेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतूर येथील सभेत सोमवारी (ता. 15) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

यावेळी परभणी लोकसभेचे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री डॉ. फोजिया खान, माजी आमदार बाबाजानी दुराणी, आमदार विजय भांबळे, माजी आमदार सुरेश जेथलिया, सभेचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, अॅड. अनवर देशमुख आदींची उपस्थिती होते.

यावेळी पुढे बोलताना श्री. पवार म्हणाले की, खाणारा जर जगावायचा असेल तर आधी धान्य पिकविणारा जगविला पाहिजे. पण सरकारकडून शेतकरी व सामान्य नगरिक यांना संपवण्याचे सातत्याने 5 वर्ष प्रयत्न करण्यात आले. हुकूमशाहीच्या दिशेने या सरकारची वाटचाल चालू झाली, असून यावर्षी जर सत्ता मोदी सरकारच्या हातात दिली तर पुढच्या काळात निश्चितच लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकी होणार नाही असे ते म्हणाले. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी फक्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झाली होती. देशामध्ये एक चौकीदार आहे तर बाकी सगळे थकबाकीदार झाल्याचे चित्र पूर्ण देशात निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात तरुण उमेदवार दिले आहे. यांना निवडून देण्याचे काम आता जनतेने करायचे आहे असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

या वेळी भाजपचे नेते गोपाल बोराडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी कुणाल आकात, पंकज बोराडे,
रमेश सोळंके, बळीराम कडपे, शत्रूगन कणसे, मधुकर झरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांनी केले. तर आभार माजी उपनगर अध्यक्ष विजय राखे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT