file photo 
मराठवाडा

हिंगोली कोविड सेंटरमध्ये तरुणांनी गोंधळ घातल्याने डॉक्टर, कर्मचारी झाले संतप्त

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रविवारी (ता.२८) मार्चच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची माहिती कर्तव्यावर हजर परिचारिकांनी दिली. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्टाफच्या इन्चार्ज ज्योती पवार यांनी संताप व्यक्त केला असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनास कळविले असून शहर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु सेंटरमध्ये कर्तव्यावर हजर कर्मचाऱ्यांची नेहमीच दमदाटी केली जात आहे. त्यामुळे काम कसे करावे असा सवाल उपस्थित केला जात असून यातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रात्री-अपरात्री कर्तव्यावर हजर परिचारिका व आरोग्य सेवकांसोबत हुज्जत घालून दमदाटी करून धमकी देण्याच्या वारंवार घटना घडत आहेत. त्यामुळे स्टाफमधील अधिकारी-कर्मचारी परिचारिका यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे कोविड सेंटर येथे पोलिस बंदोबस्त वाढवावा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर डोंगरे व रुग्णालयाच्या सर्व स्टाफच्या वतीने करण्यात येत आहे.

वाहनचालकाच्या कोरोणा रॅपिड अँन्टीजेन चाचणीत १५ जन निघाले कोरोना बाधित 

औंढा नागनाथ : येथील विश्रामगृहाच्या बाजूला राज्य रस्त्यावर उभारलेल्या कोरोना तपासणी नाक्यावर ३९२ वाहन चालकांची मंगळवारी ता. ३० रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी करण्यात आली असून यात १५ जण कोरोणा बाधित निघाले त्यांना जवळच्या कोरोणा सेंटर मध्ये भरती करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात कोरोणाचा वाढता आलेख पाहता यावर उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकाची शहरात प्रवेश करताच तपासणी करण्यासाठी तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून यात आरोग्य विभाग, महसूल,व पोलिस कर्मचारी यांच्या मार्फत पर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहन चालकाचे रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. 

तीन तपासणी नाके उभारण्यात आले असून एक बसस्थानक, पिंपळदरी फाटा, येथे उभारण्यात आले येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत असून पॉझिटिव्ह निघालेल्याना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT