Oxygen Plant Sakal
मराठवाडा

कळंब : उपजिल्हा रुग्णालयास 'अमेरियकेअर' कंपनीकडून ऑक्सिजन प्लॅन्टची देणगी

कळंबच्या आरोग्य प्रशासनाला कोविड काळात रुग्णावर उपचार करण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर मागवावे लागत होते.

दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) - तालुक्यातील नागरिकांना कोरोनाच्या तावडीतून वाचविणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयास मुंबई येथील अंधेरीच्या 'अमेरियकेअर' कंपनीकडून ८० लाख रुपये किमतीचे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लॅन्ट देणगी स्वरूपात देण्यात आला असून ऑक्सिजन निर्मितीचे यंत्रसामुग्री गुरुवार (ता. १६) उपजिल्हा रुग्णलयात दाखल झाली आहे.

कळंबच्या आरोग्य प्रशासनाला कोविड काळात रुग्णावर उपचार करण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर मागवावे लागत होते. त्यामुळे  रुग्णावर उपचार करण्याचे नियोजन करावे की, ऑक्सिजन संपल्यास त्याचे नियोजन करावे यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण निर्माण होत होता. अमेरियकेअर या कंपनीकडून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने येथील आरोग्य सुविधेला अधिकच बळकटी मिळणार आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत उपजिल्हा रुग्णलयाच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून ५ हजार हुन अधिक रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाट आटोक्यात आणण्यासाठी उपजिल्हा रुग्णलयायाला ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक गोष्टीची आवश्यकता भासत होती. सामाजिक बंधीलकीतून ऑक्सिजन प्लॅन्ट पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हा रुग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई अंदेरी येथील अमेरियकेअर कंपनीने १४ जुलै २०२१ रोजी मंजुरीची अर्डर काढून ८० लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट देणगी स्वरूपात उपजिल्हा रुग्णलयास उपलब्ध करून दिला.

विजेअभावी ऑक्सिजन प्लॅन्ट तातडीने सुरू होण्यास अडचणी

कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट होती.रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रुग्णाला बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. ऑक्सिजनचा प्रश्न आता मिटला असून मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ५० बेड ऑक्सिजनयुक्त होणार आहेत. रुग्णालयात महावितरणकडून स्वतंत्र रोहित्र बसविण्यात आले होते. मात्र, या रोहित्रवरून पुनर्वसन सावरगाव भागाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास वीज गुल होण्याचे संकट आहे. शिवाय ऑक्सिजन प्लॅन्टला सुरळीत व उच्च प्रमाणात वीजेची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वतंत्र रोहित्र बसविण्याची मागणी करण्यात आली असून विजेअभावी ऑक्सिजन प्लॅन्ट तातडीने सुरू होण्यास अडचण असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वायदंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT