Dr. Babasaheb Ambedkar sakal
मराठवाडा

Dr. Babasaheb Ambedkar : विद्यापीठामार्फतच नियमितीकरणाचा प्रस्ताव...बुद्धविहार, विपश्‍यना केंद्र

Dr. Babasaheb Ambedkar : बुद्धलेणी परिसरातील बुद्धविहार आणि विपश्‍यना केंद्र नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या गट नंबर ८ व ३१ मधील बुद्धविहार आणि विपश्‍यना केंद्र नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर करणार आहे. विद्यापीठामार्फतच तो राज्य सरकारला पाठविण्यात येईल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका व जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील बुद्धलेणी परिसरात असलेल्या जागेतील बुद्धविहार आणि विपश्‍यना केंद्राला अतिक्रमण ठरवून ते काढण्याची तयारी सुरू केली होती. त्याविरोधात शहरातील सर्वपक्षीय दलित नेत्यांनी आंदोलन छेडले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अतिक्रमणे नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश महापालिकेचे प्रशासक व पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर शहरात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या जागेला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन भाजप पदाधिकाऱ्यांना दिले होते.

या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. नऊ) शहरातील आंबेडकरी नेत्यांनी महापालिका प्रशासकांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी जी. श्रीकांत यांनी सांगितले की, जागेची मोजणी करण्यात आली असून, ही जागा वन विभागाची नसून ती विद्यापीठाने भूसंपादित केली आहे. त्यामुळे या जागेचा प्रस्ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रस्ताव शासनाकडे जाईल.

दोन्ही गट नंबरमध्ये एकूण ४.५० एकर जागा आहे, असे जी. श्रीकांत यांनी नमूद केले. बुद्धलेणी विहाराचे प्रमुख विशुदानंद बोधी यांच्यासह माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, गौतम खरात, भाजपचे जालिंदर शेंडगे, लक्ष्मण शिंदे, दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, बंडू कांबळे, एमआयएमचे अरुण बोर्डे, विनोद बनकर, प्रा. सुनील मगरे व प्रांतोष वाघमारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT