due to continuous rains breeding of mosquitoes has increased health at risk parbhani Sakal
मराठवाडा

Parbhani : परभणीला ताप, सर्दी, डोकेदुखीने घेरले; सततच्या पावसामुळे वाढली डासांची उत्पती

परभणी शहरात सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी शहरात सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. सर्दी, ताप, आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.

असे असले तरी नागरिक दुखणे अंगावर काढत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. लोकांनी दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून आजार गंभीर रुप धारण करणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

परभणी शहरात दोन दिवसांपूर्वी डेंगी सदृश आजाराने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना खालील बाबींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या परभणी शहरातील महापालिकेच्या दवाखान्यासह जिल्हा रुग्णालयात तापीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तापाबरोबरच खोकला, सर्दीचे रुग्णही वाढले आहेत.

दररोज सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सरकारी रुग्णालयात प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्याने बहुतांश रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेतांना दिसत आहेत.

अचानक ताप येणे, सर्दी होणे व यातून अंगदुखी व डोकेदुखीचे प्रकार होतांना दिसत आहेत. त्यामुळे अंगातील पेशी वाढणे व कमी होणे असे देखील प्रकार होतांना दिसत आहेत. चिकुनगुणिया सदृश्य आजाराची ही लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहरात पसरलेली घाण, अस्वच्छता, आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनातील कमतरता यामुळे डासांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

या डासांमुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या रोगांचा धोका वाढला आहे. नागरी प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि घराच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.

डासांची वाढ रोखण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. कीटकनाशकांची फवारणी, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन. नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि डासांपासून बचावासाठी नेट्स, रिपेलंट्स इत्यादींचा वापर केला पाहिजे, असे महापालिका प्रशासनाने केले आहे.

या कराव्यात उपाययोजना

  • पाणी साठवण टाळणे आणि साठलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे.

  • घरी आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखणे.

  • मच्छरदानीचा वापर करणे आणि मच्छरांपासून संरक्षण मिळण्यासाठी इतर उपाययोजना करणे.

  • ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.

  • डासांचे प्रजनन टाळा, घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.

  • त्वचेवर आणि कपड्यांवर मच्छर प्रतिरोधक क्रीम लावा.

  • शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकणारे कपडे परिधान करा.

  • ताप, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेवर लाल चकत्या आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जिल्हा प्रशासनाने हिवतापासाठी घेतलेले रुग्ण नमुने

  • जानेवारी- २२१३५

  • फेब्रुवारी -२२२९४

  • मार्च -२१२५२

  • एप्रिल -२१७१८

  • मे -२३९४४

  • जून -२५२८४

  • जुलै -१८६१३

सध्या शहरात चिकूनगुणिया सदृष्य आजाराची रुग्ण जास्त प्रमाणात येत आहेत. लहान मुलांपासून ते जेष्ठापर्यंतच्या रुग्णांचा यात समावेश आहे. ताप आल्यानंतर तातडीने आपल्या डॉक्टरांना दाखविणे उचित ठरते. परंतू काही जण स्वतः औषधी घेवून दुखने अंगावर काढतात. तसे न करता डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच औषधी घेणे आवश्यक आहे. शिळे अन्न खाऊ नका, पाणी उकळून प्यावे.

— डॉ. सुहास विभूते, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT