due to revenue staff eight days strike Problems of Students not getting certificates on time Sakal
मराठवाडा

Latur : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल; आठ दिवसांपासून प्रमाणपत्रांबाबत अडचणी

राज्यातील महसूल कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर गेले आहेत. संपाचा मंगळवारी दहावा दिवस आहे. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यातील महसूल कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर गेले आहेत. संपाचा मंगळवारी दहावा दिवस आहे. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. यात नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यात विद्यार्थ्यांना काही प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत,

महसूल विभागाचा आकृतिबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहायकाचा ग्रेडपे १९०० वरून २४०० करण्यात यावा,

महसूल सहायक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परिक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत करण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. जिल्ह्यात या संपात साडे तीनशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मंगळवारी संपाचा दहावा दिवस आहे. राज्य शासनाने त्याची अद्याप दखलही घेतलेली नाही.

कर्मचारी संपावर गेल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. सध्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या करिता विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास, राष्ट्रीयत्व, ईडब्ल्युएस असे काही प्रमाणपत्राची आवश्यकता असते. पण सध्या संप सुरु असल्याने हे प्रमाणपत्रच मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वर्ष वाया जाते की काय अशी भीतीही विद्यार्थ्यांत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही होत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेत दिलेल्या वेळेतच प्रवेश घ्यावा लागतो. अशा वेळी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागते. असे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येताना दिसत आहेत.

- डॉ. सुरेश हळहळ्ळी, प्राचार्य, बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. खरे तर प्रशासनाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी काही महिने शिबिर लावण्याची गरज आहे. यातून विद्यार्थ्यांची सोय होईल. सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे असे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाली तर विद्यार्थ्यांची सोय होईल.

सचिन बांगड, सल्लागार, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT