Dussehra vehicle sale sakal
मराठवाडा

Dussehra vehicle sale : वाहन बाजाराचे थाटात सीमोल्लंघन...दसऱ्याला नवीन २०७ वाहनांची ‘आरटीओ’कडे नोंदणी, कोट्यवधींची उलाढाल

Dussehra vehicle sale : दसऱ्याच्या निमित्ताने लातूरमध्ये वाहन विक्रीत जोरदार वाढ झाली आहे, ज्यात एकाच दिवशी २०७ नवीन वाहने नोंदवली गेली. यंदा दुचाकींची विक्री सर्वाधिक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने वाहन विक्री क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून लातूरमधील रस्त्यावर एका दिवसांत तब्बल २०७ नवी वाहने उतरली आहेत. दिवाळीपर्यंतचा विचार केला तर हा आकडा ८०० ते १ हजारांच्या घरात पोचलेला दिसेल, असा अंदाज या क्षेत्रातील व्यावसायिकांनी वर्तवला आहे.

दसरा सणाला घरोघरी उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. बाजारातही असेच उत्साह आणि चैतन्याचे वातावरण दिवसभर पाहायला मिळत होते. त्यामुळे दिवसभर बाजारपेठेत ग्राहकांची लगबग सुरू होती.

दसरा या सणाला नवीन वस्तू घेण्याची प्रथा आहे. म्हणून वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी काही दिवस आधीपासूनच वाहन विक्रीच्या दुकानात वाहनाबाबत चौकशी करणे, आवडीचा रंग निवडणे, कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करणे हे कामे पूर्ण केली होती, तर काहींनी दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून आपल्याला आवडणाऱ्या वाहनांची नोंदणी आधीच आगाऊ रक्कम देऊन केली होती. म्हणून शहरात ठिकठिकाणी असलेल्या वाहन विक्री दुकांनामध्येही ग्राहकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.

यंदा लातूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी दुचाकी घेण्याचा कल सर्वाधिक होता, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झालेल्या वाहनांच्या नोंदणीवरून स्पष्ट होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या लातूर कार्यक्षेत्रात १४ जड वाहनांची (टेंपो, ट्रक, ट्रॅक्टर), तर ४४ कारची एका दिवसात विक्री झाल्याची नोंद आहे.

तर, तब्बल ८० दुचाकींची विक्री झाली आहे. उदगीरमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यकक्षेत एकूण ६९ वाहनांची एका दिवसात विक्री झाल्याची नोंद आहे. यातही दुचाकींची विक्री सर्वाधिक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे लातूरकरांचा कल दुचाकींकडे अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या निमित्ताने आगाऊ नोंदणी केलेल्या सर्वांनाच दसऱ्या दिवशी वाहन मिळतेच असे नाही. त्यामुळे दसऱ्याआधीच्या दोन दिवसांपासून ते दिवाळीपर्यंत नव्या वाहनांची विक्री जोरात चालू असते, असे व्यावसायिकांनी सांगितले.

दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहने घेण्याचा कल असतो. त्यानुसार या दिवशी यंदा लातूरमध्ये एकूण २०७ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आमच्याकडे आहे. यात दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

– विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT