कुंभार पिंपळगाव - गुंज बुद्रुक (ता. घनसावंगी) गोदावरीच्या पात्रात शनिवारी (ता. पाच) दुपारी मासे पकडण्यासाठी गेलेले वयोवृद्ध मच्छीमार पेमा बन्सी कचरे (वय-६०) बेपत्ता झाले होते. गावातील मच्छीमारांनी व गावकऱ्यांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.
रविवारी (ता. सहा) सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू झाली होती यासाठी एनडीआरएफ च्या पथकाला बोलवण्यात आले होते. मात्र कहार समाजातील युवक, ग्रामस्थ, तलाठी यांनी चिक्कुवर बसून पोहत जाऊन शोधकार्य सुरू केले होते. पथक येण्याच्या आधीच दुपारी अकरा वाजता महादेव मंदिराच्या जवळ पेमा कचरे यांचा मृतदेह आढळून आला.
याविषयी माहिती अशी की, सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे बंधाऱ्याचेही दरवाजे उघडलेले असून गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. गुंज बुद्रुक (ता. घनसावंगी) येथील कहार समाजातील अनेक लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतात.
गोदावरीत पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात मासे सापडतात, शनिवारी दुपारी गावातील मच्छीमार पेमा कचरे हे मासे पकडण्यासाठी पात्रात गेले होते मात्र परत आले नसल्याने इतर मच्छीमार काळजीत पडले होते. दुपारपासून त्यांचा सर्वत्र शोध घेतल्या जात होता मात्र रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत.
रविवारी सकाळी महसूल विभाग, तलाठी, तहसीलदार यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली व एनडीआरएफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र हे पथक येण्याच्या आधीच तलाठी, पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थ,कहार समाजातील युवक यांनी चिक्कुवर बसून, पोहून,बुड्या घेत तपासकार्य सुरू केले होते.
दरम्यान रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान गोदावरी पात्रातील पाण्यात महादेव मंदिराच्या जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. घनसावंगी येथे शवविच्छेदन करून गुंज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात फक्त पत्नी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.