निलंगा : नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाडा वाॕटर ग्रीड योजनेतून १३५ टिएमसी पाण्याची मंजूरी देण्यात आली असली तरी या पाण्याचा फायदा लातूर जिल्ह्यासाठी होणार नाही. त्यासाठी जिल्हानिहाय पाण्याचा वाटा ठरवून द्यावा अशी मागणी माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जलसाक्षरता रॕलीच्या निमित्ताने सावरी ता. निलंगा येथे केली.
राज्य शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.या माध्यमातून एकूण १३५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. हे पाणी देतानाच शासनाने त्याचा जिल्हा निहाय वाटा ठरवून द्यावा.
त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होणार नाहीत. ज्या भागात नदीपात्रात बारमाही पाणी राहते अथवा मिळते त्या भागातील शेती समृद्ध आहे. उद्योगधंदेही तेथे आहेत पण या तीन जिल्ह्यात पाणी नसल्यामुळे रोजगाराचा अभाव आहे.
मांजरा व तेरणा नदीपात्रात पाणी राहिले तर आपल्या जिल्ह्याचाही विकास होईल,असे मत आमदार निलंगेकर यांनी मांडले. शिवाय लातूर जिल्ह्याची दुष्काळी प्रतिमा हटवण्यासाठी हजारो तरूण जलसाक्षरता रॕलीच्या माध्यमातून रस्त्यावर आले असून आजपर्यंत मराठवाड्याला चार मुख्यमंत्री मिळाले मात्र जनरेटा अभावी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना यश आले नाही पाण्याचीआजही भिषण स्थिती निर्माण झाली असून पावसाचा मोठा खंड पडला आहे.
लातूर जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून असलेली प्रतिमा पुसून टाकण्यासाठी जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून जल साक्षरता रॕली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ असा पावसाचा असमतोल निर्माण झाला आहे.
लातूर शहराला सन २०१६ साली रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. भविष्यात पाण्याची जणजागृती व्हावी भावी पिढीला पाण्याचे महत्त्व कळावे म्हणून सत्तेतील आमदार निलंगेकर यानी राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता असताना पाण्यासारख्या संवेदनाशील विषयावर जल साक्षरता रॕली सुरू आहे.
जिल्ह्यातील कोणताही आमदार अथवा खासदार या प्रश्नाबाबत बोलत नाही. किंवा जनजागृती करत नाही. हाच धागा पकडून भविष्यात पाण्यासाठी लातूरकरांचे हाल होणार नाहीत त्याना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून जल साक्षरता रॕली सुरू आहे.
पाण्याचे समान हक्क या तत्वाप्रमाणे गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येणारे पाणी बीड, लातूर, धारशिव जिल्ह्यला मिळणार नाही. प्रसंगी पाण्यावरून मराठवाड्यामध्ये जनसंघर्ष पेटून मोठे आदोलने उभे होतील म्हणून या पाण्याचा उपयोग तीन जिल्ह्याला होणार नाही यासाठी मुख्य स्र्योतातून जिल्हानिहाय पाण्याचा वाटा ठरवावा अशी मागणी केली आहे.
सध्या महाराष्ट्रभर मराठा आंदोलन, धनगर समाज आंदोलन, इतर मागासवर्गीय आंदोलन असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने पेटले आहेत मात्र लातूर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जल साक्षरता रॕलीचे अभियान राबवून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून पाण्याचे आगळेवेगळे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
याप्रसंगी, शिवानंद हैबतपुरे,दगडू साळूंके, संजय दोरवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.