नांदेड : राज्यात लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. तसेच पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साथीने साधूंचे हत्याकांड झाले. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन घटनेची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पालघर प्रकरणी पोलीसांना आरोपी करावे
पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने पोलिसांच्या समक्ष काठ्यांनी मारुन हत्या केली. या मॉबलिंचिंगच्या घटनेचा निषेध करत या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे. घटनास्थळी उपस्थित असतांना व साधूंनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचविण्याचा कोणताही प्रयत्न न करणाऱ्या पोलीसांना या प्रकरणात आरोपी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ही घटना ता. १६ एप्रील रोजी घडली. त्याची व्हिडीओ क्लिप ता. १९ एप्रील रोजी समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत आवाज उठवला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली.
हेही वाचा....शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय....काय ते वाचा
तो पर्यंत जनतेशी बोलावेसे वाटेल नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या भयानक हत्याकांडाची सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, त्यांनी त्याबाबत चार दिवसांनी ता. २० एप्रील रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातन जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली. तातडीने स्वतः या घटनेची राज्याला माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची खबरदारी घेणे अपेक्षित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः चौकशी करेपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवेपर्यंत मुख्यमंत्र्यांना याबाबत जनतेशी बोलावेसे वाटेल नाही, याचा निषेध करतो, असे श्री चिखलीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचलेच पाहिजे.... एक लाख गरीबांसाठी ते आले धावत.....
हत्याकांडावर पांघरुन घालण्याच्या प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी या विषयी बोलताना यापूर्वी राज्यात मॉबलिंचिंगचे प्रकार घडले होते. ही घटना गैरसमजातून घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधूंना रोखले असते तर असे घडले नसते अशा सबबी सांगून पोलिसांच्या साक्षीने झालेले हे हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. अशा प्रकारे या हत्याकांडावर पांघरुन घालण्याच्या प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली
राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात एका तरुणाला मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली, हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले, ठाणे येथे तरुणाच्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.