बीड - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खर्चाची केलेली कोट्यवधींची उड्डाणे अधिकाऱ्यांच्या चांगलीच अंगलट येण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांनी स्थापन केलेले पाचसदस्यीय पथक सोमवारपासून (ता. 20) दाखल झाले असून दुसऱ्या दिवशीही मंगळवारी (ता. 21) पथकाने चांगलीच झाडाझडती घेतली.
अधिकाऱ्यांचे जबाब घेण्यासह पथकाने महत्त्वाचे दस्तऐवज देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. 24) हे पथक विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ प्रशिक्षण मंडपासाठी नऊ कोटी, स्टेपल, झेरॉक्स अशा किरकोळ वस्तूंच्या खरेदीसाठी 50 लाख असा भरमसाट खर्च दाखवून निवडणूक विभागाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची तक्रार करण्यात आली होती.
हेही वाचा - पथक आले पण कोणी नाही पाहिले
याची निवडणूक विभागाने दखल घेत उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी चौकशीचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मनियार यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथील रोहयोचे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उस्मानाबादचे तहसीलदार चेतन पाटील, औरंगाबाद येथील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ प्रशिक्षण संचालक सचिन धस आणि औरंगाबाद येथीलच पुरवठा विभागाचे सहायक लेखाधिकारी राजेंद्र तारो यांचे पथक स्थापन केले. दरम्यान, सोमवारी पथक जिल्ह्यात पोचले. निवडणूक विभागातील संबंधितांची अगोदर विचारपूस करून जबाब नोंदविण्यात आले.
हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!
एका कक्षात बसून एकेकाची चौकशी केल्यानंतर खर्चासंबंधीच्या महत्त्वाच्या संचिकाही ताब्यात घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही पथकाने चौकशी केली. दरम्यान, कोणाकोणाची चौकशी केली आणि नेमक्या कोणत्या संचिका ताब्यात घेतल्या याचा तपशील कळू शकला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.