केज (जि.बीड) : तालुक्यातील (Keij) साळेगाव येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरूणाने अतिवृष्टीने शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खचून जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता.१९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव बाळासाहेब रामलिंग गीते (वय २८, रा.साळेगाव, ता.केज) असे असल्याचे सांगण्यात (Farmer Suicide) आले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पूराच्या पाण्याने शेतातील मातीसह खरिपाची उभी पिके वाहून गेली आहेत. काढणीला आलेले पिक पाण्याखाली गेल्याने (Beed) शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पेरणीसाठी केलेला खर्च निघणेही अवघड झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशा परिस्थितीत शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खचून गेलेल्या साळेगाव येथील बाळासाहेब गीते या तरूण शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लवण शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, सहा व चार वर्ष वयाच्या दोन लहान मुली असा परिवार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.