file photo 
मराठवाडा

शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना 

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आजपर्यंत सहा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मागील वर्षी १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

जिल्ह्यात २०१४ पासून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यात सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. 

शेतकरी कोलमडून पडतो
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कोलमडून पडल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात. मागील वर्षी १२२ घटना घडल्या होत्या. यंदाही नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सहा शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. या बाबत नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्महत्या सहाय्य समितीच्या बैठकीत सहा पैकी तीन शेतकरी कुटुंबांना मतद मंजूर केली. तर तीन प्रकरणांत फेरचौकशीनंतर मदत मिळणार आहे.

मागील वर्षी १२२ आत्महत्या
जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी - सात, फेब्रुवारी दहा, मार्च दहा, एप्रील तीन, मे १२, जून ११, जुलै ११, ऑगष्ट १३, सप्टेंबर नऊ, ऑक्टोबर सात व नोव्हेंबर १८, तर डिसेंबरमध्ये आठ घटना घडल्या आहेत. 

अतिवृष्टीनंतर घटनेत वाढ
जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी - सात, फेब्रुवारी दहा, मार्च दहा, एप्रील तीन, मे १२, जून ११, जुलै ११, ऑगष्ट १३, सप्टेंबर नऊ, ऑक्टोबर सात व नोव्हेंबर १८ तर डिसेंबरमध्ये आठ घटना घडल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. याच काळात नोव्हेंबरमध्ये आठरा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सहा वर्षात ८६१ आत्महत्या
सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षातील १२२ घटना घडल्या. यातील ९९ शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १२  शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. तर २०२० मधील पहिल्या महिन्यात सहा शेतकरी आत्महत्या घडल्या आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना प्रवेशानंतर जयश्री जाधवांचं सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, 'त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही'

Pune Fire: पुण्यात पार्किंगवरुन वाद; माजी सैनिकाने झाडली गोळी; नेमकं काय घडलं?

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

SCROLL FOR NEXT