batata one 
मराठवाडा

शेतकऱ्यांना मिळाला ‘बटाटा’ लागवडीतून आधार  

जगन्नाथ पुरी

सेनगाव ः मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मात्र, पारंपरिक पिकाला फाटा देऊन नगदी पीक घेण्याचा सुकळी बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. येथील सधन शेतकरी गणेश पाचपिल्ले यांनी दीड एकरात बटाट्याच्या लागवडीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम खरीप असून या हंगामात सोयाबीन तूर उत्पादनला प्राधान्य दिले जाते. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीक उत्पादनाच्या आशेवर पाणी फिरत आहे. शेतीसाठी सिंचनाची उणीव सातत्याने भासत आहे. तालुक्यातील मोजक्याच काही गावातील शेतकरी भाजीपाला, फळ लागवड, व नगदी पीक घेण्याचा प्रयोग करतात. पारंपरिक पद्धतीमुळे शेती व्यवसाय चांगलाच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

सहा शेतकऱ्यांनी घेतला लागवडीत सहभाग 
मागील वर्षी आक्टोबर महिन्यात परतीच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाची बळीराजाने तयारी केली होती. या हंगामात गहू, हरभरा, हळद यासह विविध पिके घेतली जातात. तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथील शेतकरी गणेश पाचपिल्ले, देविदास कऱ्हाळे, बाळू ठेंगल, विकास शिंदे, माधव पाचपिल्ले, सतीश पाचपिल्ले या सहा शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर कांदा लागवडीचा निर्णय घेतला होता. बियाण्यांची टंचाई भासल्यामुळे कांदा लागवडीचा निर्णय घेतला. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन या सहा शेतकऱ्यांनी प्रत्‍येकी एक ते दीड एकरात बटाट्याची लागवड केली आहे.

एकरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन
आरुषी पिक घेण्याचा पहिलाच अनुभव असल्यामुळे या शेतकऱ्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत आवश्यक माहिती प्राप्त केली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथून बटाट्याचे बेणे खरेदी करून लागवड केली. बुरशीनाशक औषधींच्या चार फवारण्या केल्या. पिकांची योग्य देखभाल घेतल्यानंतर सध्या बटाटे काढण्याचे काम सुरू केले आहे. एकरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन होत आहे. बटाटे लागवडीपासून काढणीपर्यंत जवळपास पंधरा हजार रुपये खर्च आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक पद्धतीच्या उत्पादनाचे शेतकऱ्यांचे अंदाज फोल ठरू लागल्याने या पिकांना फाटा देऊन नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. तेव्हाच अहोरात्र शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक आलेख उंचावेल, असे चित्र आहे.


बटाटे चिप्स कंपनीकडून संपर्क
तालुक्यात बटाटे पीक लागवडीचे क्षेत्रफळ अत्यल्प आहे. सुकळी बुद्रुक येथील सहा शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात यावर्षी बटाटे लागवड केली असून समाधानकारक उत्पादन आले आहे. बटाटे चिप्स तयार करणाऱ्या एका नामवंत कंपनीने शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घरपोच माल खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. बाजारापेक्षा दोन रुपये जादा दराने हा माल घेऊन जाऊ, असे कळविले आहे.

पारंपरिक पीक पद्धतीला दिला फाटा
रब्बी हंगामातील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन एकूण जमीन क्षेत्रापैकी दीड एकरात यावर्षी बटाटे लागवडीचा प्रयोग केला. त्यासाठी २२ हजार पाचशे रुपये खर्च आला असून दीड लाख रुपयांचे उत्पादन झाले आहे. निसर्गावर पूर्णतः आधारित शेती व्यवसाय संकटात सापडला असून यापुढे शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. - गणेश पाचपिल्ले, शेतकरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT